चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली माहिती
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मधील झालेल्या फुटी नंतर शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच दौरा असणार आहे. सोलापूर येथील कार्यक्रम झाल्यानंतर सांगोला कडे जाताना मंगळवेढा नगरीत शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले आहे.
मंगळवेढा तालुका हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते नेतेमंडळी यांनी जोरदार तयारी केली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांना मानणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवप्रेमी चौक मंगळवेढा येथे जंगी स्वागतासाठी येण्याचे आवाहन केले आहे.
खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा उद्या मंगळवेढा येथे दुपारी १२वाजता माचाणूर चौक येथे स्वागत व तिथून (शेतकरी हाॅटेल पासून) रॅली निघेल. तसेच मंगळवेढा शहर लगत पहिल्या ब्रीज पासून बोरळ नाक्यापासून दामाजी चौकाकडे रवाना होऊन दामाजी चौक येथे आगमन होणार आहे. तसेच शिवप्रेमी चौकात सत्कार समारंभाचे आयोजन असल्याचे सांगितले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा