हरणांचा उपद्रव वाढला शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक लातूर
लातूर जिल्ह्यातील व परिसरातील शेत शिवारात हरिणांनी उपद्रव माजवला असून खरिपातील प्रमुख पीक सोयाबीन त्यांच्याकडून खाऊन फस्त केले जात आहे .त्यामुळे शेतकरी हैराण झाले असून प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत .
लातूर जिल्ह्यातील व परिसरात वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .शिवारात दोन ते तीन हजारापेक्षा जास्त अधिक हरीण असल्याचे शेतकरी सांगत आहेत .या हरणांचा कळप शिवारात रात्रंदिवस भटकत असतो .शेतकऱ्यांना शेतीचे काम सोडून त्यांना शेतातून हुसवण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहे .ज्या शेतकऱ्यांच्या शेतात हरणाचे कळप रात्री मुक्काम ठोकतात त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन व इतर पिके ते खाऊन फस्त करतात .वन्य प्राण्यांच्या वावराने पिकांचे नुकसान होत आहे .
या भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त ही सोयाबीन पिकावर आहे .यंदा मोजकाच पाऊस पडत असल्याने सध्या तरी पिकांची परिस्थिती बरी आहे .पिकाचे चांगले उत्पादन होण्यासाठी शेतकरी कीटकनाशके फवारणी .अंतर मशागतीचे कामे मोठा खर्च करून करत आहेत . पन हे सोयाबीन पीक हरणाकडून फस्त केले जात असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे .हरणा सह इतर वन्यप्राणी सोयाबीन .मुग .उडीद .टोमॅटो आदी शेतातील पिके खाऊन फस्त करत आहेत .वन्य प्राण्यांच्या भीतीने शेतातील नवनवीन प्रयोग करण्यास शेतकरी धजावत नाहीत .हरणापासून बचाव व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी तार व साड्याचे कुंपण .काठीला कपडे लावून बुजगावणे .आवाजाची इलेक्ट्रॉनिक साधने शेतात लावली आहेत .याचा सुरुवातीला फरक जाणवला मात्र आता त्याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .
शासनाच्या संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन हरणांचा बंदोबस्त करावा शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान टाळावे .शेतकरी . संजय केंद्रे फावडेवाडी .
मी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत होतो . फळ घेत होतो .मात्र हरणाकडून पिके उध्वस्त केली जात असल्याने नवीन फळ उत्पादन घेणे बंद केले आहे .शेतकरी बापूराव हरिदास पानगांव .
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा