भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचा संकल्प करा - शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
9 ऑगस्ट क्रांती दिन व युवक कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पंढरपूर येथील हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा स्तंभाचे पुजन सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनंजय पवार यांच्याहस्ते तर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कॉंग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी यांनी प्रास्ताविकात क्रांती दिनाचे महत्व सांगितले ते म्हणाले की, "आजच्याच 9 ऑगस्टच्या दिवशी महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना भारत देशातून बाहेर काढण्यासाठी भारत छोडो, चले जाव या आंदोलनाची घोषणा केली होती या दिवसाला संपूर्ण भारत देशाच्या इतिहासात 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार आपण ही आजच्या क्रांतीदिनादिवशी भाजपमुक्त भारत हा संकल्प केला पाहिजे".
"गेल्या 9 वर्षांमध्ये केंद्रातील भाजप सरकार जीएसटी, नोटाबंदी, महागाई, अशा सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून देशाला आता काँग्रेसची गरज आहे त्यामुळे भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत" असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमाला शहर व तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा