मयताच्या नातेवाईकांनी केली आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे)
कन्नड तालुक्यातील खातखेड येथे प्रेम प्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी एका युवकाला बेदम मारहाण करून सरकारी विहिरीत टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला असून आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी पिशोर पोलीस ठाण्यात घेराव घातला. कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील ही घटना असून, प्रेम प्रकरणाच्या कारणावरून माझ्या मुलाचा खून झाल्याचा मयत नारायण रतन पवार यांच्या वडिलांचा आरोप आहे.
या प्रकरणी मयताचे वडील रतन पवार यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून मयत नारायण पवार यांच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीने लहान मुलाच्या हातून मयत नारायण याला प्रेम पत्र पाठवले ते वाचल्यानंतर मुलाच्या घरच्या मंडळींनी दुसऱ्या दिवशी ते पत्र मुलीच्या घरच्यांना दाखवले यातून या दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले. त्यादिवशी एकमेकाची समजूत घालून भांडण संपवण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास
राजेंद्र काकुळते, शरद काकुळते, प्रदीप काकुळते, नारायण काकुळते, सचिन काकुळते, कारभारी काकुळते, सचिन निकम, कांताबाई काकुळते, मंजुला काकुळते, स्वाती काकुळते, रेखा काकुळते, योगिता काकुळते, पुनम काकुळते, निमाबाई काकुळते, सीमा निकम, प्रवीण काकुळते, यतीन काकुळते, यांनी पवार यांच्या घरी येऊन नारायण याच्यासह कुटुंबातील सर्वांना हाताने काठीने व दगडाने मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करत नारायण याला उचलून नेऊन जखमी अवस्थेत शेजारील सरकारी विहिरीत टाकून दिले. त्यानंतर पवार यांच्या घरी येऊन तुमच्या मुलाला जसे विहिरी टाकले तसेच तुम्हाला देखील टाकू अशी धमकी दिली. असे रतन नथ्थू पवार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
या सर्व प्रकारात आमच्या मुलाचा मृत्यू झाला असून आम्हाला व आमच्या मुलाला मारहाण करणाऱ्या आणि त्याच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित अटक करावी तसेच प्रकारणाची सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यात यावे आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी मयताच्या नातेवाईकांनी केली आहे. पोलीस स्टेशनला घेराव घालत त्यांनी उपोषण केले. याप्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी मध्यस्थी करत प्रकरणामध्ये कलम 302 दाखल करण्यात आली आहे, आरोपींना तत्काळ अटक करण्यात येईल, मयत नारायण याचे पोस्टमार्टम सध्या पिशोर घाटी येथे चालू आहे, पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, तसेच हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात याचा खुलासा शवविच्छेदनचा अहवाल आल्यावरच कळेल, असे सांगितले
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे या करत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा