maharashtra day, workers day, shivshahi news,

श्रीगोंद्याचे तहसीलदार शिवपाणंद शेतरस्ते खुले करून जिल्हयात मोठा आदर्श उभे करतील - शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे

श्रीगोंदा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळवुन देवु - राजेंद्र नागवडे

Sharad Pawle, pioneer of Shivpanand Shetrasta movement , Rajendra Nagwade ,  Srigonda , parner , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)

शिव पाणंद शेतरस्त्यांचा उच्च न्यायलयाचा आदेश  श्रीगोंदा तहसिलदारांकडे सुपुर्द
श्रीगोंदा तहसीलदारांना तालुक्यातील प्रलंबित शिव पाणंद शेत रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याच्या मा.उच्च न्यायालयचा आदेशाची प्रत देताना श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी
दिवसेंदिवस जमिनीची वाढती तुकडेकरी त्यातुन शेतरस्त्यांचा निर्माण होत चाललेला गंभीर प्रश्न  यावर पारनेर तालुक्यात गेल्या सहा वर्षांपासुन सुरु झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीला विविध आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक स्वरूप निर्माण झाले असुन राज्यातील अनेक शेतकरी या चळवळीमध्ये सक्रिय होत असुन अनेक तालुक्यांमध्ये शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरीक पुढाकार घेत असुन यामध्ये प्रामुख्याने शेतरस्त्याच्या शेवटच्या व्यक्तीला मोठा संघर्ष याठिकाणी करावा लागत आहे.


 याचा गांभिर्याने विचार करत पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहाने याचिकर्ते शरद पवळे यांनी ॲड. प्रतीक्षा काळे यांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय ,औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक ८२४७/२०२३ मधील१७/०७/२०१७ रोजीच्या निर्णयानुसामार पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिव पाणंद शेतरस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याबाबतचा आदेश काढण्यात आला सदर आदेशास अनुसरून दि.११/११/२०२१ रोजी महाराष्ट्र शासन नियोजन विभाग रोहोयो, रोहोया विभाग यांनी विविध योजनेच्या अभिसरणमधुन मातोश्री ग्रामसमृधी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यात शासण निर्णयातील नमुद मजकुरानुसार तालुका तालुका पातळीवर तहसिलदार यांनी शेतकरी व नागरीकांचे शेत पाणंद व शिव रस्त्याबाबत प्रश्न निकाली काढण्याबाबत पुढाकार घ्यायाचा आहे.


सदर शासण निर्णयाची अंमलबजावणी व्हावी याकामी यापूर्वी पारनेर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या याचिकेवर मा. उच्च न्यायालयाने सदर शेतकऱ्यांचे प्रश्न शामण निर्णय ११/११/२०२१ मधील सुचनांचे पालन येत्या ६० दिवसाच्या आत निकाली काढण्याबाबात पारनेर तहसीलदार यांना आदेशीत केले आहे याच धरर्तीवर सदर निकाल व याचिकेच्या प्रत यांच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील शिवपाणंद शेतरस्ते खुले करण्यासंदर्भातील अर्जाला आदेशाची प्रत जोडत शिवपाणंद शेत रस्त्यांसाठी त्रस्त झालेले वर्षानुवर्षे या रस्त्यांचा प्रश्नामुळे दळवळण, आपापसातील तंटे यांचे वाढलेले प्रमाण यामुळे मामलेदार कोर्टात मोठ्या प्रमाणावर केसेस दाखल होत आहेत


  दि.११/११/२०२१ शासण निर्णयानुसार प्रत्यक्ष पाहणी करत पाणंद व शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवुन सदर रस्ते खुले केल्यास शेतकऱ्यांच्या समस्या दूर होतील यां संदर्भातील शिव पाणंद शेतरस्त्यांच्या जोडून दिलेल्या  तपशीलानुसार प्रत्यक्ष पाहणी व नंतर सुनावणी घेत ६० दिवसात निकाली काढाव्यात व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे यासंदर्भातील निवेदन, उच्च न्यायालय आदेश प्रत श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांना देताना याचिकाकर्ते शरद पवळे आदिंसह श्रीगोंदा शिव पाणंद शेतरस्ते कृती समितीचे राजेंद्र नागवडे, ॲड. . जी. बी. कडूस पाटील यांसमवेत शेतकरी नेते टिळक भोस वृक्षमित्र सचिन शेळके आदिंसह शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !