नायगाव मध्ये निवडीचे जंगी स्वागत व सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील घुंगराळा गावचे भूमिपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते वसंत सुगावे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश चिटणीस पदी (पक्षाच्या मुख्य कार्यकारीणीत) नुकतीच निवड करण्यात आली. सदर निवडीचे नियुक्तीपत्र मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.या निवडीचे नायगाव तालुक्यात जँगी स्वागत करण्यात आले
ही निवड झाल्याबद्दल नायगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचक्रोशीतील मंडळी, घुंगराळा गावातील गावकरी, वसंत सुगावे पाटील मित्रमंडळ यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घुंगराळा येथील गावकरी ,व मित्रमंडळी परिसरातील पक्ष कार्यकर्ते यांनी मिळून वसंत सुगावे पाटील यांच्या निवडीनंतर तालुक्यात प्रथम आगमना निमित्त मोटार सायकल रैली व जंगी स्वागताचे व सत्काराचे आयोजन मंगळवारी केले होते.
या स्वागत कार्यक्रमात नायगाव तालुक्यातील प्रथम गाव कहाळा टोल नाका येथे फटाक्यांची आतिषबाजी करत कहाळा टोल नाका ते घुंगराळा गावापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली या मोटारसायकल रॅलीत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता तसेच रस्त्यांच्या दुतर्फा स्वागताचे होर्डिंगस लावण्यात आले होते.तसेच घुंगराळा येथे ढोल ताशाच्या गजरात पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी करत घुंगराळा येथील गावकऱ्यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.
त्यानंतर घुंगराळा येथील खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड साहेब यांची उपस्थिती होती.. सदरील कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, उत्तर जिल्हाध्यक्ष विश्वांभर पवार, मनपा माजी विरोधी पक्षनेते जीवन पा. घोगरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष माधव पा. चिंचाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे बिलोली तालुकाध्यक्ष रणजित पा. हिवराळे ,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धर्माबाद तालुकाध्यक्ष नागेंद्र पा. चोळाखेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखेड शहराध्यक्ष सुनील मुक्कावार,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष माधव कदम, हदगाव तालुकाध्यक्ष अमोल कदम, नायगाव तालुकाध्यक्ष माधव बेंद्रीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखेड विधानसभा अध्यक्ष बालाजीराव चाफेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमित राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार समारंभात वसंत सुगावे पाटील यांचा भव्य पुष्पहार घालून गावकरी व मित्रमंडळी च्या वतीने सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर/ दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नूतन जिल्हाध्यक्ष श्री. विश्वांभर पवार,व दिलीपराव धर्माधिकारी,तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष संभाजी मुकनर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष माधव चिंचाळे यांचाही गावकऱ्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, विश्वांभर पवार यांनी मनोगत व्यक्त करून वसंत सुगावे पाटील यांना प्रदेश चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी वसंत सुगावे पाटील यांनी जंगी स्वागत व सत्कार केल्याबद्दल सर्व मित्रमंडळी चे आभार व्यक्त केले. व आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार पक्ष बळकट करून पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह सर्व निवडणुका ताकदीनिशी लढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष करू असे आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
या सत्कार कार्यक्रमास घुंगराळासह, वंजारवाडी, पाटोदा, सावरखेड, गंगणबीड, कृष्णूर,रानसुगाव, देगाव, हिप्परगा, कुंटूर, आंतरगाव या गावातील नागरीक, तरुण, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा