maharashtra day, workers day, shivshahi news,

म्हसणे फाटा एमआयडीसी मध्ये विनापरवाना उत्खनन चालू

राजरोस सुरू आहे बेकायदेशीर ब्लास्टिंग
Unlicensed mining in Mhasane MIDC, Illegal blasting continues, parner, ahamadnagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
म्हसने फाटा या ठिकाणी औद्योगिक वसाहतीचे काम झपाट्याने चालू आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत त्यातून एक कंपनी म्हणजे महेंद्रा या कंपनीचे काम युनिटी प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येत आहे या कंपनीने त्या ठिकाणी मायलिंग ब्लास्टिंग ने उत्खनन चालू आहे कुठल्याही कंपनीला ब्लास्टिंग करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो यांच्याकडे कुठलेही परवाने नसताना व आज बाजूला लोक वस्ती व वन्यजीवांचा साम्राज्य असताना या ठिकाणी मायलिंग ब्लास्टिंग घेऊन त्या ठिकाणी मोठे स्फोट घडवतात
त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ ग्राफी केली असता त्यांनी आताचे काम स्फोट घडवणे हे रात्रीच्या वेळेस चालू ठेवले आहे अधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे माननीय ॲडिशनल कलेक्टर साहेब सुहास मापारी यांच्याकडे त्याविषयी तक्रार ही केलेली आहे तक्रारीत म्हटले आहे की अनाधिकृत मायलिंग लास्टिंग या ठिकाणी चालू आहे तरी आपण यांचे अधिकृत परवाने तपासून परवाने नसतील तर यांच्यावर ती कार्यवाही करण्यात यावी व अधिकृत परवाने काढूनच काम करण्याचे त्यांना आदेशित करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी सुपा पोलीस स्टेशन तसेच एमआयडीसी संदीप बडगे साहेब पारनेर श्रीगोंदा भागाचे प्रांत साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे 
या भागात मोठ्या प्रमाणात एमआयडीसीमध्ये मोठ मोठाले खड्डे घेऊन गौण खनिज चोरी रात्रीच्या वेळेस सुरू असते तरीही प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी करून वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही होत नाही निवेदन दिल्यानंतर दोन ते तीन दिवस टीम तैनात असते त्यानंतर पुनश्च हे ऐवतरीत्या काम चालू होते तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे कारण हे सर्व काम पारनेर तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या वरदहस्त्यानेच होत असते कारण की प्रशासनावरती दबाव टाकण्याचे काम राजकीय नेते हेच करतात तरी या ठिकाणी अशा चालणाऱ्या ऐवतरीत्या कामांवरती महसूल मंत्री साहेब यांनी लक्ष वेधले होते. 
त्यावेळेस अशा अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्यांना चाप बसला होता तसेच आत्ता या ठिकाणी कोणाचेच लक्ष राहिले नाही असे दिसून येते तरी यांस वरती कार्यवाही व्हावी व पुनश्च या गौण खनिज संदर्भात महसूल मंत्री साहेब यांनी लक्ष विधीत करावे अशा स्वरूपाचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश कुलथे यांनी दिले आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !