केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड व मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी भगवान जाधव)
चिंचोली नकिब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तातेराव शंकरराव बनसोडे यांना शिक्षण सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या शिक्षण शहर समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार असून तातेराव बनसोडे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विश्व् फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थित तातेराव बनसोडे यांना दिनांक 03 सप्टेंबर 2023 रोजी प्रदान केला जाणार आहे.
तातेराव बनसोडे यांना शिक्षण सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्याध्यापक संतोष बडक, सह शिक्षक नितीन जंगले, कृष्णा फलके, अशोक पवार, पुंडलिक मालकर, गजानन पवार, योगेश मोरे, यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी भगवान जाधव, आण्णा जाधव, अनिल देहाडे तसेच गावातील नागरिक पालक यांनी तातेराव बनसोडे यांचे अभिनंदन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा