पाहणी करून ग्रामस्थांशी साधला संवाद
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी जातेगाव येथील श्री भैरवनाथ मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसराची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला.तसेच गायकवाड कुटुंबाच्या घरी सांत्वन पर भेट दिली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच वर्षा पासून वंचित आसणाऱ्या दलित समाजाच्या स्माशन भूमीचा प्रश्न मार्गी लावून देण्याचे आश्वासन व गायकवाड कुटुंबातील या लहान मुलींच्या उदरनिर्वाह साठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
यावेळी देवस्थान ट्रस्ट तर्फे व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार बाळासाहेब गायकवाड यांनी केला यावेळी मा. सरपंच विठ्ठल पोटघन, देवस्थान अध्यक्ष सुनीता पोटघन, चेअरमन जालिंदर पोटघन, सामाजिक कार्यकर्ते व देवस्थान सचिव. सचिन ढोरमले, बाळासाहेब फटांगडे, पुजारी प्रकाश गुंजाळ, रावसाहेब गायकवाड, डी.एन. गायकवाड, बाळासाहेब शेलार, व्यवस्थापक विजय गायकवाड, विनोद गायकवाड, संतोष हारगुडे,ओम गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते प्रस्तावना मा.सरपंच सोपान पोटघन (सर) यांनी केली व उपस्थितांचे आभार युवा नेते आकाश बाळासाहेब गायकवाड यांनी मानले.भैरवनाथ देव दर्शनाने जी उर्जा मिळते, ती द्विगुणित करण्यासाठी भाविकांना उत्कृष्ट सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न ट्रस्टने करावा. व येथील अर्थकारणाला बळकटी मिळावी या साठी पर्यटनाच्या दृष्टीने परिसर विकसित करावा आशा भावना डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा