आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
त्रिमूर्ती आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजन : वाघुंडे खुर्द येथे त्रिमूर्ती आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने सेवा निवृत्त सैनिकांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे व पोपटराव पवार यांच्या हस्ते सेवानिवृत्त सैनिकाचा सन्मान करण्यात येणार आहे. रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 1:30 च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या गौरव समारंभात गोरक्षनाथ सिताराम मगर, रोहिदास कोंडीबा मगर, व गणेश रघुनाथ मगर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी पारनेर-नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष शिवाजी पालवे, सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी कर्नल हरिभाऊ मगर व कॅप्टन बलभीम मगर यांच्यासह देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष,उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ, वाघुंडे खुर्द चे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन व्हा. चेअरमन संचालक मंडळ, पारनेर तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्रिमूर्ती आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा