वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाट
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद प्रतिनिधी नारायण सोनटक्के
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त धर्माबाद मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी रत्नाळी वृक्षारोपण करुन श्रीक्षेत्र वाडी हनुमान मंदिर येथे खा. चिखलीकरांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे यासाठी महाआरती करण्यात आली.,व परिसरामध्ये वृक्षारोपण करून पाटोदा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा जन्मदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला .
नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा. चिखलीकर यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत असून अगदी तालुक्यातल्या छोट्या छोट्या गावात सुद्धा त्यांचा जनसंपर्क वाढत आहे वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेततर धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेऊन प्रतापराव पाटील यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी रवींद्र पोतगंटीवार ( तालुका अध्यक्ष) शिवराज पाटील गाडीवान, जिल्हा प्रवक्ते,.
समाज कल्याण कलावंत मानधन निवड समिती सदस्य अशोक पाटील वडजे ,
किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष पिराजी पाटील चव्हाण, भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक साईनाथ शिरपुरे, नारायण पाटील पवार,नरेश रेड्डी, लक्ष्मण वडणावार ,मनोहर मिरदोडे ,राजु जल्लोड,सज्जन गडोड, चेतन घाटे महादेव समसते, शंकर डाकोरे, पुंडलिक समसते,पोशट्टी चातरमल,नरेश मंतोड व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा