नायगांव येथे ''बुद्ध आणि त्यांचा धम्म "ग्रंथ वाचनास प्रारंभ
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
नव्यानेच निर्माण झालेल्या विश्व शांती बुद्ध विहार वसंत भूमी परिसर चे उद्घाटन,पंचशील ध्वजा रोहन , पिंपळ वृक्ष रोपण "बुद्ध आणि त्यांचा धम्म "या ग्रंथाचे वाचणं शुभारंभ नायगांव नगर पंचायत च्या नगर अध्यक्षा सौ.मीनाताई सुरेश पा.कल्याणआणि उप नगर अध्यक्ष मा.विजय पा. चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रथमच आमच्या नायगांव शहरात महामानवाच्या ग्रंथाचे वाचन होत आहे त्याचा मला मनस्वीआनंद होत आहे.
मा.आमदार वसंत रावजी पा. यांच्या विकासाभिमुख भूमिकेचा आम्हाला अभिमान असून आम्ही सेवक आहोत या विहाराच्या विकासा साठी आम्हीकटिबध्द आहोत काहीही कमी पडू देणार नाही असे वचन दिले .तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड चे बी. डी.कांबळे, तालुका शाखेचे अध्यक्ष डॉ. शिवाजी कागडे, सरचिटणीस भीमराव सोनकांबळे यांनी धम्म विचारा बाबत मार्गदर्शन केले.
या वेळी सर्व नगर सेवक ,नगर सेविका सौ.सुमनबाई भीमराव सोनकांबळे आणि मोठ्या संख्येने उपासक,उपासिका पत्रकार प्रकाश हणमंते , कार्य करते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.से.प्रतिनिधी सुनील सोनकांबळे आणि सूत्र सचलन प्रा.राहुल वाघमारे सर यांनी केले.आभार मनोगत अमोल जोंधळे यांनी केले.
ग्रंथ वाचन दि.01.08.2023 ते दि.28.10.2023 पर्यंत दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत चालणार आहे,तरी सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यातहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाग लोक समिती चे कार्यकरते सुरेश सोनसळे,सिद्धार्थ सर, राहुल भद्रे सर, सचिन वाघमारे ,सिद्धार्थ गायकवाड,नितीन गायकवाड, राहुल इंगळे, विशाल भद्रे, सूरज काळेवार,भूषण काळेवार संकलप जमदाडे, प्रवीण वीरभद्र, संघर्ष सोनसळे यांनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा