प्राणप्रतिष्ठापना, कलश रोहन, भव्य रथयात्रा, व महायज्ञ सोहळा
प्रतिनिधी: सदाम दरेकर पारनेर
आद्य परम सद्गुरु स्वामी शिवानंद दादाजी व आद्य जगत जननी जगत माता धुनी द्वारिका मैया यांच्या कृपा आशीर्वादाने श्री. श्री. 1008 महान धुनिवाले धनंजय सरकार व परमपूज्य माऊली माताजी श्री. क्षेत्र पिंपळनेर (परमधाम ) ता. साक्री जि. धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र खंडाळा ता. नगर येथील नूतन श्री. ओम शिवानंद दादाजी दरबार मध्ये दिनांक 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान 5 दिवस प्राणप्रतिष्ठापना, कलश रोहन, रथयात्रा सोहळा, महायज्ञ व प्रकट दिन सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती उपजिल्हाप्रमुख शिवसेना तथा जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांनी दिली.
श्री शेत्र खंडाळा ता. जि.अ.नगर येथे नूतन आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार उभारण्यात आला असून दिनांक 10 ते 14 पर्यंत 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 10 ऑगस्टला कलश रोहन व प्राणप्रतिष्ठापना, महा अभिषेक,महाआरती, सत्संग, ज्ञानदान, व ध्यानधारणा हवनाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 11 रोजी महाआरती अभिषेक हवन ज्ञानदान ध्यानधारणा महाआरती महाप्रसाद दिनांक 12 रोजी आरती अभिषेक ध्यानधारणा ज्ञानदान हवन महाप्रसाद होणार आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी यश प्राप्ती हवन होणार आहे.
यामुळे संसारीक अडचणी दूर होऊन व्यवसायात यश प्राप्ती व आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. आजारपण, नवग्रहाच्या दोषापासून मुक्तता, काळाचे भय नष्ट होऊन नकारात्मक शक्ती पासून मुक्तता मिळते. भौतिक जीवनात ताण तणाव कमी होऊन मनुष्य मानसिक दृष्ट्या भक्कम होतो. बुद्धी विकास होतो, याची वेळ सकाळी 8:00 ते यज्ञ संपेपर्यंत आहे. ज्यांना या यशप्राप्ती हवनाला बसायचे आहे त्यांनी बाळासाहेब मुळे सर, दौलत कार्ले मो.9420344647 किंवा 7972201219 वर संपर्क साधावा दि. 14 रोजी आरती अभिषेक, ध्यानधारणा,ज्ञानदान, व महाप्रसाद संध्याकाळी 5 ते8 रथयात्रा सोहळा व स्वामीजींचे अनमोल ज्ञानदान होणार आहे. रथयात्रेचा मार्ग श्री.क्षेत्र खंडाळा ते श्री. शेत्र आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार खंडाळा रात्री आठ ते दहा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम व प.पू. शरण्या प्रकट दिन होऊन महाप्रसादाने 5 दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी या 5 दिवसीय कार्यक्रमात रोज तसेच भव्य रथयात्रेमध्ये व आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार मध्ये होणाऱ्या यशप्राप्ती महायज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे तसेच सर्व भाविक गुरुबंधूंनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपले आध्यात्मिक कल्याण प्राप्त करून घ्यावे असे आवाहन आयोजक आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार श्री.क्षेत्र खंडाळा यांच्या वतीने उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, विश्वात्मक ओम शिवानंद दादाजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवाजी भोर, सचिव जालिंदर दांगडे, उपाध्यक्ष कृष्णांत शिंदे, खजिनदार बबनराव खेडकर, नंदकिशोर उबाळे, सुनील यादव, विकास चोभे अनिल कोठुळे मोहन कांबळे, बाळासाहेब लोटके, रघुनाथ चोभे तुषार वामन भारत साळवे मामा, मनोज जाधव, राजू पोटघान, ओंकार मुळे,दीपक कांबळे, रोहित बनसोडे,अनिल लोटके, अनिल दळवी,दिलीप कांबळे, प्रमोद लोटके व भक्त परिवार आदींनी केले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात आद्य स्वामी शिवानंद दादाजींचा मोठा परिवार आहे. या सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा