रेनापुर शहरातील विकास कामांना आमदार रमेश आप्पा कराड यांनी गती दिली - शहरवासीयांच्या भावना
शिवशाही वृत्तसेवा, लातूर (जिल्हा प्रतिनिधी उदयकुमार पाठक)
रेणापूर येथील गाव भागात असलेल्या श्री बालाजी मंदिर परिसरात सभागृह बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आ.रमेशआप्पा कराड यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, महेद्र गोडभरले, सिद्धेश्वर मामडगे, सुधाकर गवळी, प्रताप पाटील यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी आ रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी मंजूर करून विकास कामांना गती दिली. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणापूर शहरातील गाव भागात असलेल्या श्री बालाजी मंदिर परिसरात भव्य दिव्य सभागृह व्हावे आणि भाविकाची सोय व्हावी यासाठी भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिला त्याबद्दल श्री बालाजी मंदिर ट्रस्टच्या आणि भाजपाच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या वतीने यथोचित सत्कार करून जाहीर आभार व्यक्त केले. सदरील बालाजी मंदिर सभागृहासाठी आणखी गरज पडली तर निश्चितपणे निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी आ कराड यांनी दिली.
यावेळी श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे युवराज पाटील, लक्ष्मण कातळे, सुधीर खणके, बाळासाहेब पाटील, मधुकर कातळे, भागवत पाटील, रमाकांत कोळी, राजू शिंदे, यांच्यासह भाजपाचे दत्ता सरवदे चंद्रकांत कातळे, दिनकर राठोड, राजकुमार आलापुरे, शेख अजीम, हनुमंत भालेराव, अच्युत कातळे, उत्तम चव्हाण, गणेश माळेगावकर, केशव पिशवे, योगेश राठोड, रफिक शिकलकर, सुभाष राठोड सागर हाके, उमेश नरवटे परमेश्वर मोटेगावकर, जयदीप बोडके श्रीनिवास हाके यांच्यासह अनेक जण होते. यावेळी आ रमेशआप्पा कराड यांनी उपस्थिताशी रेणापूर शहरातील विकास कामाबाबत चर्चा केली
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा