नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
शिवशाही वृत्तसेवा, जालना, (जिल्हा प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण)
भोकरदन तालुक्यातील कोदा गावात धुमाकूळ घालणारी माकडांची टोळी पकडून दूर वन क्षेत्रात नेऊन सोडण्याची अन्वा भोकरदन तालुक्यातील कोदा मागणी केली होती. गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडांच्या टोळीला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही माकडे पकडून पिंजऱ्यात बंद केली. गावामध्ये आलेल्या या माकडांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. महिला, लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांमध्ये माकडांची भीती पसरली होती. याबाबत सरपंच आरती काळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देऊन माकडे पकडून दूर वन क्षेत्रात नेऊन सोडण्याची मागणी केली होती
वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. नांदवटे, वनपरिमंडळ अधिकारी बी. एम. पाटील, डी. व्ही. पवार, वन्यजीव प्राणी मित्र समाधान गिरी, संदीप गिरी, वनमजूर श्याम गव्हाणे, दयाजी सिंगारे आदींच्या पथकाने रविवारी गावात येऊन माकडे पकडून पिंजऱ्यात जेरबंद केली. माकडांच्या त्रासापासून सुटका केल्याबद्दल नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला, तसेच वन अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा