महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश
शिवशाही वृत्तसेवा, अकोला (जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर)मेळघाटात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खिंडार पडले असून मेळघाटातील राष्ट्रवादीच्या नेत्या दुर्गाताई बिसंदरे यांनी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व खासदार अनिल बोन्डे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश मेळघाटात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे भेल संचालक रमेश मावस्कर, तालुका अध्यक्ष हिरालाल मावस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव खडके, राज्य महिला सचिव क्षमा चौकसे, माजी तालुका अध्यक्ष अप्पा पाटील, महासचिव सुनील लखपती, संयोजक मन की बात श्याम गंगराडे, सुहास सालफळे, लक्ष्मण जांभेकर, धोंडीबा मुंडे, मनीष पांडे, दिपक नागले, सुशील गुप्ता, प्रकाश मावस्कर, कमलेश जयस्वाल आदी पदाधिकारी उपस्थतीत होते,
दुर्गाताई बिसंदरे ह्या मागील पंधरा वर्षांपासून राजकीय क्षेत्रात सक्रिय असून धारणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष या पदावर १० वर्षापसून काम करत होत्या, सामाजिक,राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असल्याने धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यावर त्यांची चांगली पकड आहे.
यासोबत धारणी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस नर्मदा महेंद्र गवई, महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दुर्गा पाटणकर, अनिता सुकलाल डाहाके, संगीता रमेश भिलावेकर, अनिता राजेश भिलावेकर, कमला नागले तर चिखलदरा तालुक्यातील राजेश भूतू भागवत, सुलभा सतवासे, ललिता सतवासे, माया गोकुल भागवत, माला प्रदिप सतवासे, मुकेश बछले, राजकुमार लक्ष्मण बेलकर, शिवदास अमोदे, दिनेश भागवत, नारायण बेठेकर, अजय भुसूम, मुकेश हरसूले, प्रितेश बिसंदरे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे मेळघाटात आता भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले आहे.
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा