maharashtra day, workers day, shivshahi news,

मुख्यमंत्र्यांनी शेतरस्त्यांच्या शासननिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ठोस भुमिका घ्यावी - शरद पवळे

सरकारने ब्रिटिशकालीन शिव पाणंद शेत रस्त्यांच्या तातडीने हद्द निश्चित कराव्यात - सामाजिक कार्यकर्त शरद पवळे
Chief Minister should take concrete role for farm roads, Boundaries should be determined immediately, eknath shinde, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
शरद पवळेंचे राज्य सरकारला पत्र
पारनेर तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ता चळवळीला उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठे यश प्राप्त झाले असुन गेल्या सहा सात वर्षांचा संघर्षं चळवळीची व्यापकता करत आहे राज्यातील विविध ठिकाणांहून यासंदर्भा शेतकरी चळवळीत सहभागी होत आहे ब्रिटीश कालीन शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्दीचे नंबरी गायब झाले असुन जमिनिची वाढत चाललेली तुकडेवारी यामुळे शेतकरऱ्यांचा आपापसात संघर्ष वाढत चालला असल्याकारणाने अनेक फौजदारी स्वरूपाच्या घटना समोर येत आहेत 
त्यामुळे परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत शिव पाणंद शेतरस्ता चळवळचे शरद पवळे यांनी मुख्यमंत्र्यांना ग्रामीण भागातील शेतरस्त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून शासन निर्णय तातडीने अंमलबजावणी करावी, नकाशाप्रमाणे गावोगावच्या शिवपाणंद शेतरस्त्यांच्या सरसकट मोजणी करून हद्द निश्चिती करण्यात याव्यात,शेतरस्ता केसेस प्रलंबित ठेवून शासन निर्णयाची अमलबजावनी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,तहसील,जिल्हाधिकार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयाकडे येणाऱ्या प्रत्येक अर्जाचे उत्तर संबंधित विभागाने नागरिकांना देण्याचे बंधनकारक करावे, 
महाराष्ट्रातील शिवपाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या असून बदलत्या सरकारकडून शेतरस्त्यांच्या बाबतीत शासननिर्णयात बदल केले जातात प्रत्यक्ष अमलबजावनी होत नाही शेतकरी पुत्रांचा होणार संघर्ष थांबवण्यासाठी आमच्या अर्जाचा मुख्यमंत्र्यांनी सहानुभुतीपूर्वक विचार करावा व राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी तातडीने दखल घ्यावी असे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पत्राद्वारे विनंती वजा मागणी केली आहे.
प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा व निसर्गाचा ढासाळलेला समतोल जणू शेतकऱ्यांची परिक्षाच घेत नसुन अंत पहात आहे अशा परिस्थित आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बळीराजा उन वारा पाऊस याचा विचार न करता मोठा संघर्ष करत आहे त्यातच शेतरस्ता म्हणजे शेतीच्या रक्तवाहिण्या त्या बंद होत असतील तर हे मोठ दुर्भाग्य आहे यासाठी एकजुटीने अन्नदात्याच्या खालेल्या अन्नाला जागण्याची वेळ आली आहे
शरद पवळे      
शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते    

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !