maharashtra day, workers day, shivshahi news,

पहिल्या श्रावण सोमवारी चेअरमन अभिजीत पाटील यांनी माचनूर येथील सिद्धनाथाचे घेतले दर्शन

मंगळवेढा तालुक्यातील गावांना भेटी गाठी वाढल्या
On the first Shravan Monday, Chairman Abhijit Patil visited Siddhanath temple at Machnoor, mangalwedha, shivshahi news 
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील हे सध्या मंगळवेढा तालुक्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंगळवेढा येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून शरद पवार यांचे मन जिंकले होते. तसेच शरद पवार यांना पक्षातील सदस्य, पदाधिकारी सोडून जात असताना अभिजीत पाटील हे मात्र निष्ठेची भूमिका बजावत आहेत.
पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री अभिजीत पाटील यांनी आज दिनांक २१ऑगस्ट रोजी माचनूर येथील प्रसिद्ध असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीचे पदाधिकारी, तसेच माचनूर गावचे सदस्य, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !