maharashtra day, workers day, shivshahi news,

डोंगरवाडीचा चारा छावणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला - तहसीलदारांनी दिली हमी

मनसेच्या पाठपुराव्याला यश
The problem of fodder camp and drinking water was solved, Success to MNS's pursuit, parner, shivshahi news,
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
सोमवार ( दि. २१)
दोन दिवसांपर्वी डोंगर वाडी च्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याच्या व्यथा पारनेर चे मनसे उपाध्यक्ष महेंद्रभाऊ गाडगे यांच्याकडे मांडल्या होत्या, ठरल्याप्रमाणे आज सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तहसीलदार गायत्री सौंदाने मॅडम यांना महारा्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या फेऱ्या उद्यापासून वाढवून देऊ , तसेच चारा छावणी सुरु करण्या संधर्भात वरिष्ठांशी बोलून पुढील आठ दिवसात चारा छावणी सुरु केली जाईल अशी ग्वाही तहसीलदार गायत्री सौंदाणें यांनी दिली असून, पारनेर तालुक्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प प्रमाणात असल्याची जाणीव आहे, व चारा छावणी सुरु करण्या साठी प्रशासनाकडे लेखी निवेदन येणं गरजेचं होतं, ते आज मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 
या वेळी पारनेर तालुका उपाध्यक्ष महेंद्रभाऊ गाडगे व तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के , तसेच सोपान भाऊसाहेब डोंगरे,  बळशिराम देवराम डोंगरे, शरद गगे, गुलाब लामखडे बाबाजी गगे बारकू गगे उत्तम डोंगरे भाऊसाहेब डोंगरे भाऊसाहेब लामखडे राहुल डोंगरे शांताराम डोंगरे बंटी डोंगरे हरिभाऊ लामखडे तबाजी डोंगरे शिवाजी डोंगरे सुभाष डोंगरे अरुण डोंगरे संजय कडूसकर सुरेश कडूसकर बाळू कडूसकर भीमा डोंगरे रमेश डोंगरे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी महेंद्रभाऊ गाडगे व सतीश म्हस्के तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मदतीला धावून आल्याबद्दल आभार मानले.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !