शनिवार दि. २९ जुलैपासून होती बेपत्ता
शिवशाही न्यूज वृत्तसेवा पुणे,(जिल्हा प्रतिनिधी अभिषेक जाधव)
पुणे दि ६: -दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते सांगून निघालेल्या नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला हे गूढ अद्याप कायम आहे.
दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन लावला. त्यावेळेला तिने नीलिमा मी गावी ओमळी येथे ते आहे असे सांगून निघाली आहे अशी माहिती दिली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेड असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तिच्या घरच्यांनी चिपळूण परिसरातही नीलिमा हिची शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी कर्मचारी निलीमा सुधारकर चव्हाण (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) या शनिवार दि. २९ जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा