लाईनमन मात्र बाहेरगावी घरभाडे घेऊन मस्त
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे 33 विज उपकेंद्र असून येथे तीन लाईनमिनची शासकीय लाईनमन यांची भरती करण्यात आली असून सदर लाईनमेनला पगार आहे. मात्र घरभाडे शासनाकडून घेऊन सदर लाईन स्वतःच्या गावी राहून कुंटूर येथे ये जा करीत असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी गेलेल्या विजेचा फ्युज टाकण्यासाठीही कोणी नसल्याने नागरिकांना अंधारात रात्र जागुन काढावे लागते आहे, रात्रभर नागरिकांना जागुन काढावे लागत असून हा प्रकार गेल्या सात ते आठ महिन्यापासून चालू असून याकडे सर्व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. कुंटूर येथील वार्ड क्रमांक एक मध्ये वारंवार हीच पुरवठा खंडित होत.
असतानाही नागरिकांचे ओरड सुरू असून सदर लाईन यांना वेळोवेळी सांगितल्यानंतरही त्यांचा काहीच उपयोग होत नसून लाईनमन पेक्षाही दुसरेच कारभारी ची संख्या जास्त असल्याने त्या लाईनमनचेही काही चालत नसल्याचे परिचित आहे . त्यामुळे गावात मीटर धारक संख्या एकूण सातशे पन्नासच्या वर आहेत . मात्र वीज आकडे आकडे चोरीचे प्रमाण हजाराच्या वर असल्याचेही चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या आकडे बाहादरावर कारवाई करण्यासाठी लाईनमिन व तालुक्यामधील वीज वितरण कंपनीचे अभियंता दुदमल साहेब यांनीही पुढे येत नसून सदर आकडेबहादराकडून चिरीमिरी घेऊन गावातील काही लाईनच्या हाताखाली राहणारे नागरिकांचे पोट भरत असते अशी चर्चाही गावात सुरू आहे . त्यामुळे सामान्य नागरिकांनी बीज मीटर बिल भरूनही त्यांना वेळेवर वीज मिळत नाही वारंवार फोन करून फुयज टाका फ्यूज गेला.
असे सांगून सुद्धा रात्रीच्या वेळी लाईन राहत नसल्याने नागरिकांना अंधारात काढावे लागत आहे . यावेळी सदर लाईन यांना फोनवरून माहिती घेतली असता आल्यावर पाहू करू असे बोलून फोन बंद केला . तसेच वीज वितरण कंपनीचे जेई दुधमल साहेब यांच्याशी संपर्क केला असता मी आल्यावर पहातो म्हणून सर्व फोन बंद केला यामुळे सदर 33 के व्हि उफ केंद्र अंतर्गत कोणाचे एकमेकावर नियंत्रण नसल्याने सदर कारभार चालत असल्यामुळे नागरिकांना यांचा त्रास होत आहे . याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देवून वीज वितरण कंपनीच्या कारभाराला सुरळीत करण्यात यावे व विजपुरवठा वाढ नंबर एक मागासवर्गीय गल्लीमध्ये पुरवत करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा