maharashtra day, workers day, shivshahi news,

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमाला जालना पोलिसांकडून अटक

अग्निशस्त्र बंदूक गन पावडर छत्रे इत्यादी सह साहित्य जप्त 

Arrest of illegal weapons , jalana , shivshahi  news.

शिवशाही वृत्तसेवा, जालना (जिल्हा प्रतिनिधी, मुस्तफा खान पठाण)

जालन्यात बेकायदेशीर भरमारसह एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले आहे. यात सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले असं या आरोपीचं नाव आहे. शहरातील खरपुडी रोडवरील हरिगोविंदसिंग नगरमध्ये एका व्यक्तीच्या घरात बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले याच्या घरी छापा टाकला असता त्याठिकाणी एक अकरा हजार रुपये किंमतीची भरमार सामग्रीसह आढळून आली.


सोमवार दि 21 ऑगस्ट रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी जालना शहरासह परिसरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणा-या ईसमांवर कार्यवाही करण्या बाबत पथकाला सुचना केल्या, तसेच जालना शहरामध्ये अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणा-या ईसमांचा शोध घेत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाली की, शहरातील हरिगोविंदसिंग नगर, सरस्वती माता मंदीरा शेजारी . खरपुडी रोड जालना येथे राहणाऱ्या सागरसिंग फंटयासिंग अंधरेले याने त्याचे राहते घरामध्ये एक भरमार (अग्नीशस्त्र) विनापरवाना बेकायदेशीर रित्या बाळगले असल्याची माहिती मिळाली, ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर खनाळ यांना दिली. 


तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक सागरसिंग फंटयासिंग अंधरेले याचे खरपुडी रोडवरील राहते घरी जाऊन त्याचे घराची पंचासमक्ष पाहणी केली असता त्याचे राहते घरी 11 हजार 245 रु किंमतीची एक लाकडी बटमध्ये फिक्स केलेली भरमार म्हणजेच अग्नीशस्त्र, त्यासाठी वापरणारी बारुद पावडर, एक लोखंडी छडी, एक छ-याचे पाकीट अशा वर्णनाची भरमार सामग्रीसह मिळुन आल्याने सदर गुन्हयातील आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन, पुढील कार्यवाही करीता पोलीस ठाणे तालुका जालना यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास, योगेश सहाने यांनी केली आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !