२३ ते २७ ऑगस्ट दरम्यान पादुका पूजन सोहळा
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र आयोजित श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या विजयराथाचे आगमन व पादुका पूजन सोहळा पारनेर तालुक्यात बुधवार दि. 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. बुधवार दि. 23 रोजी पारनेर तालुक्यातील आळकुटी येथे श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पूजन सकाळी 8:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत, निघोज येथे गुरुवार दि. 24 रोजी सकाळी 8:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत, राळेगण सिद्धी येथे शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी 8:00 वाजल्यापासून ते सं. 6:00 वाजेपर्यंत सुपा येथे शनिवार दि. 26 रोजी सकाळी 8:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत, तर पारनेर येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात सकाळी 8:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकावर पंचामृत अभिषेक व नव धान्य अभिषेक होणार आहे.
यावेळी प्रत्येक ठिकाणी सकाळी 6:00 वाजता, दहा वाजता व संध्याकाळी 6:00 वाजता, श्री.स्वामी समर्थांची महाआरती होणार आहे. पंचामृत अभिषेकाने विद्या अभ्यासात प्रगती होते. नोकरीच्या समस्या मार्गी लागतात. बढती होते. यशप्राप्ती होते. नवधान्य अभिषेकाने नवग्रह आणि 27 नक्षत्र शांती होऊन त्यांची कृपादृष्टी लाभते. कुंडली मधील दोष नाहीसे होतात. जसे की, कालसर्प शांती, मंगल दोष नाहीसे होऊन अडलेली कामे मार्गी लागतात.
पादुका पूजन मुळे कुलदेवता, कुलदैवत यांचा कोप नाहीसा होऊन पितृदोष नाहीसा होतो. घरात सुख शांती लाभते. पूजनानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका डोक्यावर ठेवल्या जातात. त्यामुळे व्याधींचे निवारण होऊन शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. व शरीरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. भारतातील कर्नाटक, गोवा, पणजी, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमधून श्री.स्वामी समर्थ महाराजांचा हा विजय रथ पारनेर तालुक्यात दिनांक 23 ते दि. 27 असे पाच दिवस फिरणार आहे. तरी तालुक्यातील सर्व श्री. स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी प्रणित श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा