शिवसेना नेते गजेंद्र देशमुख व भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख जावेद यांचे तहसीलदारांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
वार्ड नं.1 हा आधी शेती क्षेत्राचा भाग होता मागील काही वर्षात येथे वसाहत मोठ्या प्रमाणात झाली आहे,येथील दुर्लक्षित सांडपाणी व्यवस्थापनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे मंदिर, मज्जित, जवळील गल्लीत सांडपाणी विल्हेवाट करण्यासाठी नाली नसल्याने या पाण्याचे जागोजागी डोह साचत आहे ,साचलेल्या डोहामुळे मच्छर देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे, त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपरोक्त विषयास अनुसरून शिवसेना नेते गजेंद्र देशमुख सर व भाजपा अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख जावेद भाई यांनी तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन देऊन सांडपाण्याच्या व्यवस्थापन करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी शेख समद शेख अमजत, रामेश्वर शंकर पवार, शेख इरफान शेख समद , व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा