रुग्ण आणि दररोज शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (प्रतिनिधी भगवान जाधव)
वावना ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर येथे काही लोक शेतवस्तीवर राहातात. 2019 मध्ये सर्व शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून १ कि.मी.रस्ता तयार केला. त्या पुढील रस्त्यासाठी तहसिलदार यांना वारंवार पत्र दिले.परंतु त्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना मदत केली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या लोकांना रस्ताच मिळालेला नाही.
या वस्तीवर या काळात एखादी व्यक्ती आजारी झाली तर दवाखान्यात पर्यंत जाऊ शकत नाही . 2001 पासुन तर आतापर्यंत ग्रामपंचायतीने फक्त रस्ता करून देवू आसे आश्वासन देऊन निवडणून आले. त्याचा काहीच फायदा झाला नाही. यात विद्यार्थी ,रूग्ण,यांचे खूप हाल होत आहे. जर या रस्ता अभावी कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा अंतिमसंस्कार तहसिल कार्यालयासमोर फुलंब्री येथे करू आसे नागरिकांनी सांगीतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा