पुणे येथील प्रसन्न फाउंडेशनचा समाज उपयोगी उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी सूर्या येथे प्रसन्न फाउंडेशन पुणे श्री सतीश गोपाळ झंजाड, अँ.प्रतिभा सतीश झंजाड, अँ.प्रज्ञेश सतीश झंजाड, पुनम झंजाड , अजिंक्य दरेकर, कार्तिक शेटे, यांच्या सहकार्याने इयत्ता १ ते ७वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रसन्न फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश्वरी ताई कोठावळे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी).भाऊसाहेब नाना आढाव, चंद्रकांत कोठावळे, निवृत्ती आढाव, भाऊसाहेब झंजाड, प्रशांत गाडे मित्रपरिवार, किसन कोठावळे, रामदास कोठावळे सर, चंदर आढाव, नवनाथ कोठावळे, दिनकर कोरडे, सागर आढाव, प्रमोद आढाव, आणि ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
श्री गुंजाळ सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी राजेश्वरी ताई कोठावळे व अँ.प्रज्ञेश झंजाड यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य कोठावळे मॅडम यांनी आभार मानले.व शेवटी अशोक कोठावळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा