दोषींना तात्काळ निलंबित करा - आ. राजेश पवार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
धर्माबाद तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांनी राशन दिले नसून गरजु लाभार्थींचे हाल होताना दिसून येत आहेत त्यामुळे नागरिक संतप्त झालेल्याची चर्चा होत आहे
सविस्तर वर्त असे की धर्माबाद तालुक्यात ५७ गावे असून परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे एकूण शिधापत्रिकेची संख्या १७४४४असून त्यापैकी अंत्योदय मध्ये२४५५, प्राधान्य योजना मधील १०८१८ व केसरी रंगाचे ४१७१ शिधापत्रिका आहेत.
गेल्या तीन-चार महिन्यापासून स्वस्त धान्य वितरण व्यवस्था जाणून-बुजून कोलमडण्यात आल्याचा आरोप पुरवठा विभागावर होत आहे. मे महिन्यात तर तब्बल नऊ गावात स्वस्त धान्य वाटपच न झाल्याचे धक्कादायक वृत्त चर्चेत असून ५० किलोच्या प्रत्येक धान्याच्या पोत्यामागे दीड ते दोन किलो धान्य अनेकांना कमी येत होते . त्याचा फटका स्वस्त धान्य दुकानदारांना व त्यांनी जर चलाखी केली तर ग्राहकांना बसत आहेत.
गेल्या तीन महिन्यापासून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराच्या व ग्राहकाच्या पुरवठा विभागाच्या विरुद्ध तक्रारी दिवसेंदिवस वाढतच गेल्या असून त्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय पाटील डांगे यांच्या नेतृत्वात आमदार राजेश पवार यांच्या सूचनेनुसार शासकीय गोदामात चौकशीसाठी गेले असता नुकतेच रुजू झालेले गोदामपाल नेहरकर यांनी गोदामास कुलूप लावून चक्क सर्व कार्यकर्त्याच्या समोरून धूम ठोकली होती.
तदनंतर पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार पंडित राठोड यांनी उपस्थितांना अतिशय बेजबाबदार उत्तरे दिल्यामुळे पुरवठा विभागासह संबंधित यंत्रणेच्या विरोधात रोष वाढला घटनेची माहिती मिळताच आ.राजेश पवार यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली आहे.
पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पंडित राठोड यांना उपस्थितांनी गोदामपाल का पळाले? असा प्रश्न विचारला असता गोदाम पाल हे मानसीक दृष्टा योग्य नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले असल्याचे विजय पाटील डांगे यांना सांगीतले तर मग त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असे असताना त्यांना गोदामपाल कसे केले हा प्रश्न उपस्थित करित विकृत मनोवृत्तीच्या अशा कर्मचाऱ्यास का पाठीशी घातले जात आहे असा प्रश्न डांगे यांनी उपस्थीत केला होता.
तालुक्यातील काहीं स्वस्त धान्य दुकानातून बहुतांशी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना नियमित धान्य सोबत साखरच मिळत नसल्याचे धक्कादायक वृत्त असून सर्वांनी मिळून मिसळून महिन्याकाठी किंवा दोन महिन्यानंतर साखरेची विल्हेवाट काळ्या बाजारात लावत असल्याच्याही तक्रारी आल्या आहेत.तसेच नियमित धान्य वाटपात देखील तफावत आढळत असे एकूणच पुरवठा विभागाची यंत्रणा जाणून बुजून ढेपाळली असल्याचे चित्र दाखवत महिन्याकाठी शेकडो क्विंटल गोर गरीबांचे हककाचे धान्य कळ्या बाजारात पाठविणारी साखळी सक्रिय असून यातील सर्व दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी केली या संदर्भात आमदार राजेश पवार यांनी देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना रीतसर चौकशी करण्यासाठी पत्र दिले आहे त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील महिन्यात स्टिंग ऑपरेशन द्वारे भाजपा माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील डांगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ग्रामीण भागातील राशन दुकानात वाटपाच्या वेळी अचानक जाऊन पाहणी केली असते 50 किलो धान्य आसलेल्या पोत्यात 40 किलो,42किलो,44 किलो धान्य आढळून आले. पांचासमक्ष त्यावेळीच याची नोंद घेण्यात आली तसेच छायाचित्र काढण्यात आले. प्रत्येक पोत्यातून कमी होणारे धान्य कुणाचे कुरण ठरत होते हे स्पष्ट होण्यासाठी यातील साखळीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे असून गोर गरीबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली तरच हा गोरखधंदा थांबणार आहे अशी प्रतिक्रिया विजय पाटील डांगे यांनी व्यक्त केली आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा