देडगाव ग्रामस्थांची बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (प्रतिनिधी विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जवळपास 6500 लोकसंख्या आहे. देडगाव मध्ये ए.डी.सी.सी बँकेचे जवळपास १५०० खातेदार असून देडगाव पासून नऊ किलोमीटर अंतरावर एक शाखा आहे. महिला व वयस्कर खातेदारांना नियमितपणे व्यवहारासाठी दूर अंतरावर जाणे गैरसोयीचे होते. तसेच बालाजी येथे कोणतेही बँकेची शाखा नाही, त्यामुळे देडगाव मध्ये ए.डी.सी.सी बँकेची शाखा सुरू करावी अशी पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी बालाजी देडगाव ग्रामपंचायतीने गुरुवार दिनांक 26 जुलै रोजी शाखा सुरू करण्याबाबत ठराव करून, ए डी सी सी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे दिला आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आकाश भाऊ चेडे, पोलीस मित्र समितीचे अध्यक्ष शहादेव मुंगसे, पोपट बनसोडे, हरिभाऊ मुंगसे, यांनी ए डी सी सी बँकेची शाखा देडगाव मध्ये लवकरात लवकर सुरू करून द्यावी अशी विनंती केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा