रवींद्र महाजनी यांचा दयनीय अंत
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले आणि 80 च्या दशकात ज्यांनी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य केले असे जेष्ठ चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. पुण्याजवळील तळेगाव येथील ते भाड्याने राहत असलेल्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे रवींद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून रवींद्र महाजनी तळेगाव येथे भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होते. शुक्रवारी रवींद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी तात्काळ धाव घेत घराचा दरवाजा तोडला तेव्हा पोलिसांना महाजन यांचा मृतदेह आढळून आला सुमारे दोन ते तीन दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी हा इतर सर्व कुटुंबीयांसोबत मुंबईत राहतो पोलिसांनी त्याला रवींद्र महाजन यांच्या मृत्यूची माहिती दिली असून शुभविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला .
सर्वसामान्य कुटुंबातून आलेले रवींद्र महाजनी यांनी 80 च्या दशकात मराठी हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1975 मध्ये मी शांताराम यांच्या झुंज या मराठी चित्रपटा द्वारे त्यांनी चित्रपटसृष्टी पदार्पण केले. लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, थोरली जाऊ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांमुळे त्यांना एक चांगला अभिनेता म्हणून ओळख मिळाली. मुंबईचा फौजदार आणि देवता या त्यांच्या चित्रपटाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या दोन्ही चित्रपटाने त्याकाळी कमाईचे उच्चांक निर्माण केले होते. या दोन्ही चित्रपटातील अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठावर रेंगाळत असतात.
राजबिंडे रूप, उंचा-पुरा देह, तरल अभिनय, स्पष्ट आणि परिणामकारक संवादफेक, आणि घायाळ करणारे स्मित, हे रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. मराठी चित्रपट सृष्टीत रवींद्र महाजन यांच्या रूपाने एका चॉकलेट हिरोने अक्षरशः राज्य केले आहे.
मात्र या उमद्या कलाकाराचा शेवट खूपच दयनीय झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कलाक्षेत्रावर दुःखाचे सावट पसरले असून, कलाकारांपासून रसिकांपर्यंत सर्वच जण रवींद्र महाजनी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा