नाईलाजास्तव मुख्याधिकारी यांना द्यावे लागले स्मरण पत्र
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
बुलडाणा शहरातील मिलिंद नगर भागात पेयजल योजनेसाठी रस्ते उकरले असून अद्यापही ते रस्ते बुजवले गेले नाही याकरिता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री.गौतम खरात यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना स्मरणपत्र सादर करण्यात आले असून त्यांमध्ये रस्त्याची दुरुस्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी यापूर्वी २९ मार्च २०२३ रोजी करण्यात आली होती तरी पण या सर्व गोष्टी कडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष आहे. मुख्याधिकारी श्री.पांडे यांना निवेदन दिल्यावर त्यांनी २ ते ३ दिवसात उकरलेले रस्ते ठीक करण्यात येतील असे आश्वासन देखील दिले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा