maharashtra day, workers day, shivshahi news,

प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली.

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

Women and Child Welfare Commissioner Dr. Prashant Naranware, pune, shivshahi news,
शिवशाही वृत्तसेवा पुणे,(जिल्हा प्रतिनीधी अभिषेक जाधव)
पुणे दि १०:- भारतीय प्रशासन सेवेतील सन २००९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली. बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन उपायुक्त वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सुचिता साकोरे, सहाय्यक आयुक्त मनीषा बिरारीस, सहाय्यक आयुक्त ममता शिंदे, परीविक्षाधीन अधीक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी सांगली येथील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद व पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सिडकाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि समाज कल्याण आयुक्त यासारखी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. समाज कल्याण आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात त्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !