महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा पीक कर्ज नूतनीकरण मेळावा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तामसा अंतर्गत आष्टी येथे पीक कर्ज नूतनीकरण मेळावा रविवार दि. ०९ जुलै २०२३ रोजी संपन्न झाला. या वेळी क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. निखिल नाफडे यांनी आष्टी गावातील शेतकरी व ग्रामस्थांना संबोधित केले व पीक कर्ज नूतनीकरण करण्याचे फायदे व न करण्याचे नुकसान समजाऊन सांगितले .सर्व थकित पीक कर्ज धारकांनी आपले कर्ज नियमित करून मुख्य प्रवाहात यावे व शासनाकडून वेळोवेळी मिळणारे प्रोस्थाहन पर अनुदान याचा लाभ घ्यावा .
असे आवाहन या ठिकाणी श्री नाफडे यांनी केले. आष्टी येथील सर्व शेतकरी बांधवांनी सुधा याला भरभरून प्रतिसाद देत आपले पीक कर्ज नूतनीकरण करून घेऊ अशे आश्वासन दिले.क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी श्री. प्रकाश कांबळे यांनी सुद्धा या ठिकाणी शेतकरी बांधवांना पीक कर्ज नूतनीकरना बद्दल मार्ग दर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचानल पवार सर यांनी केले या वेळी अनिल रावते, चारुशीला भोवते , दोडके सर व समस्त असंख्य शेतकरी गावकरी उपस्थित होते ..
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा