बामणी येथील डिपीचे होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा : मालोजी कदम
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर
कंधार तालुक्यातील बामणी (पंक) येथे गावाशेजारी असलेल्या डीपी इतर सत्र हलवून त्या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.
त्या ठिकाणी गुत्तेदाराने मनमानी करत जुनेच पोल सह इतर साहित्य हे जुने असल्याचे आढळून येत आहे व ते काम गुत्तेदार व इंजिनिअर हे मनमानी पणाने काम करत आहेत डीपी हलवण्याचा ग्रामपंचायतीचा कुठलाही ठराव नसताना व गावकऱ्यांची कुठलीही परवानगी त्याला नाही त्याचप्रमाणे होत असलेल्या डीपी बसवण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून ते काम इस्टिमेट प्रमाणे होत नसल्याने हे काम गावातील ग्रामपंचायतचे सदस्य मालोजी कदम यांनी प्रत्यक्षात पाहणी केली असता त्या ठिकाणी होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे आढळून आले असता त्यांनी ते काम बंद केले आहे.
बामणी येथे दोन डीपी आहेत हे दोन डीपी तीन पोलवर बसवण्याचे काम चालू आहे पण त्या ठिकाणी दोन डीपी बसवण्यासाठी चार पोलची आवश्यकता असते पण ते काम इस्टिमेट प्रमाणे न करता त्या ठिकाणी बोगस काम करून बिले उचलण्याचा गोरख धंदा गुत्तेदार आणि इंजिनिअरच्या माध्यमातून होत आहे.
ते काम इस्टिमेट प्रमाणे व गावकऱ्यांची सहमती घेऊन करण्यात यावे असे ग्रामपंचायतचे सदस्य मालोजी पाटील कदम यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा