शेळगांव (गौरी) येथील वारा-पाऊसामुळे घराची झाली पडझड
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगांव तालुक्यात विजेच्या कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.दि 26 जुन रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह पावसाचा फटका बसलाय.पण यात अंनदा दिगांबर शिंपाळे या शेतकऱ्यांच्या घराची पुर्ण पडझड झाली आसुन कुटुंब उघडयावर पडले आहे,
नायगांव तालुक्यात सोमवारी दि.26 जून रोजी जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळं विटाचे साधे घर संपूर्ण पडले आहे. पावसामुळे झाडाचेही मोठं नुकसान झालं तर अंनदा दिगाबंर शिंपाळे यांच्या घरांचीही पडझड झाली आहे.
या घराची पाहाणी व पंचनामा करण्यासाठी तहसिल विभागातील गावचे तलाठी विजय पाटील जाधव याची उपस्थिती होती.या नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाला शासनाच्या वतीने मदतीसाठी गावचे सरपंच प्राचार्य डाँ.मनोहर तोटरे सर.ग्रामविकास अधिकारी धनराज केत्ते. यानी दिलासा दिला तर यावेळी गावातील सुधाकर पाटील.विनायक पाटील.संतोष देशमुख.प्रभाकर काठेवाडे व गावातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा