मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 567 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते नांदेड उत्तर मतदार संघातील 567 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला यावेळी नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर, खासदार हेमंत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामाचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाने राबवित असलेल्या विविध योजनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले असून याच कार्यक्रमात 567 कोटीच्या कामाची भूमिपूजन ही करण्यात आली आहे.
सर्व कामे लवकरात लवकर पूर्णत्वाकडे जावीत अशी देखील सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली आहे. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमात कुठलाही अभिजीत पगार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन यांनी सुद्धा चौक बंदोबस्त ठेवला होता.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा