अचानक विठ्ठल वारी करण्यासाठी आले तेलंगणाचे मुख्यमंत्री सत्ताधारी विरोधक दोघे थंड झाले
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी सोलापूर जगदिश कोरीमठ
सोलापूर येथे तेलंगणा प्रदेश मुख्यमंत्री के सी आर पक्षाचे म्हणजे के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशी निमित्त आपल्या मंत्र्याच्या थाप्यासह पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन त्यानंतर तुळजाभवानीचे घेण्यासाठी सर्व मंत्र्याच्या थाप्यासह सोलापूर येथे दोन दिवसाच्या मुक्कामी आले होते अचानक विठ्ठल वारी करण्यासाठी आलेल्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात उलटापालट झाली सोलापूर मध्ये अवकाळी वादळासारखी अचानक एन्ट्री झाली गुलाबी झेंड्याने आणि मोठमोठे बॅनर्समुळे संपूर्ण सोलापूर शहर राजस्थानच्या पिंक सिटी जयपुर सारखे भासत होते सर्वत्र राजकारणातील मंडळीत चर्चेला ऊत आला होता इतकी हवा ते दोन दिवसातच करून मंगळवारी संध्याकाळी ते लक्झरी मधून हैदराबाद कडे रवाना झाले.
ड्रायव्हरची बाजूलाच समोरच्या सीटवर बसल्याने सर्व रस्त्याकडेला उभारलेल्या नागरिकांना देखील त्यांची झलक पाहायला मिळाली तुळजापूर येथून संध्याकाळी पाचच्या दरम्यान येथील बीजेपी चे माझी खासदार कैलासवासी लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांना भेटण्यासाठी प्रियंका चौकात घरी आले होते त्यांच्यासोबत सर्व मंत्रिमंडळ होते आमदारांचाही थापा सोबत होता दहा ते पंधरा कार गाड्या आणि पोलिसांचा फौज फाटा घेऊन मुख्यमंत्री अर्धा तासाची भेट घेऊन हैदराबाद कडे रवाना झाले दोन ते तीन तास चॅनलच्या पत्रकाराने ओल्या यांच्या घराजवळ मुख्यमंत्री बोलतील या आशेवर प्रतीक्षा केली परंतु केवळ पाच मिनिट सुद्धा वृत्तपत्र आणि मीडिया पत्रकारांशी काहीच न बोलता हैदराबाद कडे रवाना झाले फक्त मंत्रिमंडळाचे श्री मल्हारी राव एकामंत्र्यांनीच पत्रकारांची बातचीत केली ते म्हणाले अबकी सरकार किसान सरकार पुढे म्हणाले सध्या तेलंगाना येथे आम्ही सर्व शेतकऱ्यांना वीजपुरवठा मोफत करीत आहोत.
परंतु महाराष्ट्रात गॅस महाग पेट्रोल महाग अन शेतकऱ्याला तर बिलकुल सुविधा नाहीत असे येथील सरकार विरोधात त्यांनी बोट दाखवल आहे आमच्या सरकार महाराष्ट्र स्थापन करू आणि निवडून येऊ अशी त्त्यांना खात्री आहे नागेश् वल्याळ देखील लवकरच आमच्या पक्षात प्रवेश करतील असे त्यांनी बोलून दाखवले आता एमआयएम नंतर मराठी केशरी आपले पाय पसरवत आहे तेलंगणा मंत्र्याचे चर्चेवरून दिसून येत आहे त्यामुळे विरोधक व सत्ताधारी पक्षांत आता या पक्षाबद्दल भीती व्यक्त होत आहे उलट सुलट चर्चाही प्रत्येक ठिकाणी रंगत आहे मुद्दामच हेलिकॉप्टरने आम्हाला पुष्प वृष्टी करू दिले नाही आणि बाहेरूनच दर्शन आम्ही घेऊन आलो तरी आम्ही याची दुःख करत बसत नाही असे त्यांनी बोलून दाखवली त्यांनी सोलापुरात केलेले हवा म्हणजे अवकाळी वादळासारखी ठरली आता यापुढे कोणत्या दिशेने के सी आर मुख्यमंत्री पाऊल उचलेल हा येणार काळच ठरवेल
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा