कु.ऋतुजा वाघमारे व कु.निकिता भालेराव यांनी नेट परीक्षा 2023 च्या परीक्षेमध्ये घवघवीत यश
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
आपल्या परिस्थितीची जाण ठेवून आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती करण्यासाठी कु.ऋतुजा वाघमारे व कु.निकिता भालेराव यांनी नेट परीक्षा 2023 च्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे नायगाव येथे रा.ना. मेटकर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही विद्यार्थिनीचा सन्मान करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
नेट 2023 च्या परीक्षेमध्ये कुमारी ऋतुजा चंद्रकांत वाघमारे या विद्यार्थिनीने 513 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे तर नायगाव महात्मा फुले कॉलनी येथील कुमारी निकिता माधवराव भालेराव या विद्यार्थिनींनी देखील 541 गुण प्राप्त करून खूप मोठे यश मिळविले आहे. याबद्दल फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ मंचचे प्रमुख रा.ना. मेटकर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही विद्यार्थिनीचा सत्कार करून भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आलेल्या वेळी डॉक्टर भिष्मा झुंजारे, होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर प्रभाकर गायकवाड, मुख्याध्यापक पंढरी कोत्तेवार,प्रा. बालाजी गायकवाड, मुख्याध्यापक उत्तम गायकवाड, वृंदावन नामवाडे, लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे यासह दोन्ही विद्यार्थिनीचे आई वडील उपस्थित होते.
समाजातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली विद्यार्थिनी नेट परीक्षा मध्ये घवघवीत यश संपादन केले असल्याने त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो आहे,सदर विद्यार्थ्यांचे कौतुक आणि आशीर्वादाची थाप त्यांच्या पाठीवर असणे गरजेचे आहे म्हणून लहु, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ या मंचच्याद्वारे विद्यार्थ्यांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो आहे असे प्रतिपादन आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रा.ना. मेटकर यांनी व्यक्त केले आहे.----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा