ह.भ.प. गाथामुर्ती श्री. सदगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर याच्या हरी किर्तनाचे आयोजन
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
हरिहर बापुदेव महाराज कोलंबीकर, मुकूंद महाराज कोलंबीकर, ह.भ.प.श्री. वासूदेव महाराज कोलंबीकर या बंधूत्रयांच्या 61 ते 65 वर्षपुर्णत्वा निमित्ताने ह.भ.प गाथामूर्ती श्री. सदगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या सपत्नीक तूलादान कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.20 जून रोजी शहरातील अंबिका मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
या निमित्ताने ह.भ.प. गाथामुर्ती श्री. सदगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर याच्या हरी किर्तनाचे आयोजन ही अंबिका मंगल कार्यालय येथे मंगळवार दि. 20 जून रोजी सकाळी ठिक 9:30 ते 11:30 च्या दरम्यान करण्यात आले आहे. यानंतर येथेच सदगुरू व सदगुरू पुत्र यांचे सपत्नीक तुलादान होईल. तसेच ज्यांच्या 61 ते 65 वर्षपर्ती सोहळ्याच्या तिन्ही बंधूत्रयांच्या मातोश्री यांचाही तुलादान संपन्न होणार आहे तदनंतर महाराजंचा दर्शन सोहळा संपन्न होणार आहे. तरी या त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन जोशी कोलंबीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आसून या कार्यक्रमाचा परिसरातील सर्व भाविक भक्तानी लाभ घेण्याचे अव्हान जोशी कोलंबीकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा