खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची टीका
शिवशाही वृत्तसेवा, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे भारतीय जनता पार्टी चा वतीने आयोजित डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोदी@9 या कार्यक्रमांतर्गत डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते .
या डब्बा पार्टीच्या आयोजनासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीभाषण करत असताना नांदेडच्या विकासासाठी अशोकराव चव्हाण यांच्या कडे पन्नास वर्षे सत्ता अजूनही एक किलोमीटरचा हायवे बनवला नाही का ? त्यांना कोणी नको म्हटलं होते का ? फक्त त्यांच्या कार्यकाळात निवडणूक निवडून यायचे निवडणूक मध्ये पैसा टाकून पुन्हा काढायचं एवढेच माहित आहे . अशी टीका प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर केली आहे .
अशोक चव्हाण यांनी नांदेडचा विकासाला पूर्ण पणे निकृष्ट दर्जाच्या कामाचे झालर लावले आहे. रस्ते असो व पुलाचे बांधकाम आमदार पासून ते सर्व गुत्तेदार पर्यंत टक्केवारी घेतल्याशिवाय कामे केली नाही . त्यामुळे त्या टक्केवारीच्या नादामध्ये सर्व रस्ते व पुलाचे काम बोगस झाले आहे . देशाला नरेंद्र मोदी व राज्याला देवेंद्र फडणवीस यांचा शिवाय पर्याय नाही तसेच ग्रामस्थांना व सामान्य जनतेला बीजेपी शिवाय पर्याय नाही अशी प्रतिपादन प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार यांनी कुंटूर येथील डब्बा पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजनात केले आहे .
यावेळी व्यासपीठावर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,बालाजी बच्चेवार , भास्कर भिलवंडे, राजेश गंगाधर कुंटुरकर, व बीजेपी चे कार्यकर्ते तसेच जनसंपर्क कर्मचारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुका संदर्भात तसेच लोकसभेच्या संदेश पोहोचण्याचे काम आम्ही हाती घेतले असून लोकांचा जनसंपर्क वाढवण्यासाठी आम्ही लोकसभा निवडणूक 2024 ची डोळ्यासमोर ठेवून आम्ही गावागावात जनसंपर्क वाढवित आहोत व डबा पाठीचे आयोजन करत आहोत. मोदी सरकारने नववर्षात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हे जनसंपर्क व डब्बा पाठीचे आयोजन करण्याची ठरवली असल्याची माहिती ही प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांनी दिली आहे .
महाजनसंपर्क अभियानांतर्गत डब्बा पार्टी आयोजन करण्यात आले .
बीजेपी ने सरकारने खूप चांगली कामे केली आहे . काँग्रेस सरकारला एकच माहिती आहे निवडणुकीमध्ये पैसा टाकायचा व निवडणूक झाले की काढत बसायचा हाच एकमेव पर्याय त्यांना माहिती होता म्हणून रस्ते असो व कोणतेही जनतेचे कामे त्यांनी केले नाही . म्हणून जनता बीजेपी सरकारला निवडून दिले आहे.
भास्करराव पाटील खतगावकरांनी यांच्यावर निशाणा साधला भास्करराव यांचे सध्या भान गेल्यासारखे वागत आहेत त्यामुळे ते प्रताप प्रताप अशी भाषा करतात मी त्यांना जर भास्कर अशी भाषा केली तर वाईट वाटेल अशीही यावेळी बोचरी टीका प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे .
मोदी सरकारच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व रस्ते मोठे रस्त्यासाठी निधी देण्यात आला व चांगले रस्ते पक्के रस्ते ही बनविवण्यात आले मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे हा सर्वात मोठा रस्ता बनल्यामुळे जनतेला याचा मोठा फायदा झाला आहे काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात एक किलोमीटरचाही रस्ता अशोकराव चव्हाण नांदेड मध्ये बनवला नाही कांग्रेस सरकार भ्रष्टाचारीचे सरकार होते त्यामुळे जनतेने त्याला हाणून काढून सध्या बीजेपी सरकारला निवडून दिले यापुढेही बीजेपी सरकारच येणार असून पुन्हा नऊ महिन्याच्या नंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे सर्व कळणार असल्याचीही ग्वाही यावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.
भाजपाच्या डब्बा पार्टी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भाजपाने आपली गटबाजी कायम राखली आहे कारण येथील मतदारसंघातले विद्यमान आमदार राजेश पवार यांची या कार्यक्रमात अनुपस्थिती होती.---------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा