अभियांत्रिकी क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एमएचटी सी.ई.टी परीक्षा देणे अनिवार्य
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
राज्य सामाईक प्रवेश विभागांतर्गतघेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल १२
जून रोजी जाहीर झाला. त्यात धर्माबाद शहरातील सरस्वती नगर मध्ये राहणारी उर्दू शाळेतील विद्यार्थिनी शेख सानिया शेख लतिफ हिने विशेष प्राविण्यासह पीसीएम ग्रुपमध्ये ८६.५५ टक्के गुण प्राप्त करून यशसंपादन केले आहे. विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी परिक्षेत उर्दू शाळेत तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळवला.१२ नंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एमएचटी सी.ई.टी परीक्षा देणे अनिवार्य असते.
शेख सानिया हिचे वडील साधे सरळ प्रमाणिक व्यक्तिमत्त्व असणारे शहरातील शैफ अल्ली दर्गाचे पुजारी (सेवक) शेख लतीफ शेख अहेमद ऊर्फ लतीफ ( बाबा) या नावाने सुपरिचित आहेत.गरिबी कुटूंबात जन्मालेली शेख सानिया आपल्या परिस्थितीवर मात करून पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण उर्दू हायस्कूल धर्माबाद येथे शिक्षण घेऊन १२ परिक्षेत उर्दू शाळेतून तालुक्यातुन प्रथम आली तर एमएचटी -सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळवले.शेख सानिया हिने मिळालेल्या यशाबद्दल उर्दू शिक्षक संस्थेचे अध्यक्ष म.जावेद म.जब्बारोद्दिन व शिक्षकांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक सत्कार करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अनेकांनी अभिनंदन केले आहे.
----------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा