प्रदीप पा. हुंबाड यांचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी राजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे.त्यासाठी शेतकरी बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत येत आहे त्यासाठी शेतकऱ्याने बोगस बियांना पासून सावध राहण्यासाठी कृषी दुकानदाराकडून ओरिजनल बिल व पावती घेऊन बी बियाणे व खते खरेदी करावेत असे आव्हान प्रदीप पाटील हुंबाड छावा मराठा युवा महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे.
व त्यानी जिल्हा अधिकारी साहेब नांदेड व कृषी अधीक्षक साहेब नांदेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.नांदेड जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे बनावट कंपनी थाटून भामटेगिरी करून बनावट बियाणे तयार करून पेरणीच्या तोंडावर बोगस बियाणे शेतकऱ्याला देऊन फसविण्याचा गोरख धंदा कृषी दुकानदाराकडून केला जात होता तो जागृत नागरिकांनी हाणून पाडला आहे.
व वाहतूक करणाऱ्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नागरिकांच्या जागृती पणामुळे सोयाबीनच्या बोगस बियाणाचा नांदेड जिल्ह्यात भांडाफोड झाला आहे ट्रक चालकासह ९९ लाखाच्या सोयाबीनच्या बनावट बियाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपण बि.बियाणे खरेदी करताना बोगस बियाणे देऊन आपली कृषी दुकानदाराकडून फसवणूक होऊ शकते त्यासाठी शेतकऱ्याने आपले बी बियाणे खरेदी करताना ओरिजनल पावती व बिल घेऊनच खरेदी करावे व बोगस बियाणे निघाल्यास त्या कृषी दुकानदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्या शेतकऱ्यांना बियाण्याच्या उत्पनाप्रमाणे नुकसान भरपाई त्या कृषी दुकानदाराकडून देण्यात यावी व ज्या कृषी दुकानदाराकडून बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक केल्याचे आढळून आल्यास त्या कृषी दुकानदाराने बोगस बियाणे दिले आहे.
अशा दुकानदाराला शेतकऱ्याला सोबत घेऊन त्या कृषी दुकानदाराची धिंड काढून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना उत्पन्नाप्रमाणे नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल शेतकऱ्यांच्या पाठीशी छावा मराठा युवा महासंघ खंबीरपणे पाठीशी राहील ज्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले आहेत अशा शेतकऱ्यांनी छावा मराठा महासंघाला माहिती द्यावी असे आवाहन प्रदीप पाटील हुंबाड छावा मराठा युवा महासंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दिलेल्या निवेदनावर मधुकर पाटील संपर्कप्रमुख नांदेड प्रकाश पाटील मोरे, महेश पाटील, संभाजी पवळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा