खरीप पूर्व हंगाम आयोजित शेतकरी मेळावा
शिवशाही वृत्तसेवा,जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
खरीप पूर्व हंगाम आयोजित शेतकरी मेळावा महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने घेण्यात आला .हा मेळावा दिनांक 17.6.23 रोजी घरणी तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे संपन्न झाला या मेळाव्यास श्रीमती. कांबळे यू.ओ. सरपंच घरनी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले,तर प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री.पी.वी. शेरे व तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानोबा धोंडीराम पाटील घारोळा प्रगतशील शेतकरी ,नरशींग पाटील घारोळा,उपस्थित तज्ञ मार्गदर्शक श्रीमती अंजली गुंजाळ कृषी विज्ञान केंद्र लातूर यांची उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमास माननीय सुदर्शन बोराडे तंत्रज्ञान समन्वयक यांनी शून्य मशागतंत्रज्ञानाविषयी माहिती दिली, तसेच माननीय बालाजी टाळीकुठे यांनी सेंद्रिय शेती या संदर्भात माहिती दिली. माननीय मस्के बी.पी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चाकूर,मा. घोसे डी.एल जिल्हा समन्वयक हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार, यांची उपस्थिती होती, सदर शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना शेती विषयी पूरक माहिती देण्यात आलेली आहे.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी महिला व शेतकरी उपस्थिती होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ रेणुका तोडकरी अध्यक्ष, सौ. इजरतबी चांद शेख सचिव, संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा