व्यसनाकडे न जाता ज्ञानविचाराकडे वळले पाहिजे असाही मानस या रामकृष्ण मिशन आश्रम यांचा आहे.
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
देश अराजकता कडे जात आहे या देशाला सक्षमपणे उभे करण्यासाठी राष्ट्रपुरुषांच्या प्रगल्भ विचाराशिवाय पर्याय नाही आजच्या तरुणांना राष्ट्र पुरुषांचा विचार समजून घेण्यासाठी रामकृष्ण मिशन आश्रम छत्रपती संभाजी नगर येथून नायगाव नगरीमध्ये स्वामी विवेकानंद यांचा प्रगल्भ विचारांचा ज्ञानरथ उपलब्ध झाला आहे, तेव्हा विविध विषयावरील स्वामी विवेकानंदाचे पुस्तक उपलब्ध येथे असून वाचक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन या ज्ञान रथाचे प्रमुख योगेश पेहेरे यांनी केले आहे.
स्वामी विवेकानंद यांचे या देशात कुठे कुठे कोणत्या विषयावर भाषणे झाली. त्यांनी जनकल्याणासाठी कुठे कुठे पत्र पाठवली आणि यासह त्यांचे अनमोल विचार अशा असंख्य पुस्तकांचा प्रकल्प साठा या ज्ञानरथमध्ये उपलब्ध आहे, वाचक प्रेमींनी ज्ञान रथाला भेट द्यावी आणि बुक्स खरेदी करावी लग्नप्रसंग वाढदिवस किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमात एकमेकाला ज्ञानदान वाटप करण्याचे कार्य करावे हे कार्य पवित्र असून तरुण वर्ग व्यसनाकडे न जाता ज्ञानविचाराकडे वळले पाहिजे असाही मानस या रामकृष्ण मिशन आश्रम यांचा आहे. म्हणून नायगाव शहरांमध्ये ज्ञानरथ उपलब्ध काही दिवसांसाठी असून स्वामी विवेकानंद यांची प्रगल्भ विचारसरणीची पुस्तके खरेदी करावी असे नम्र आवाहन या रताचे प्रमुख योगेश पेहेरे यांनी केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा