एक जण गंभीर जखमी अनेक प्रश्न अनुत्तरीत
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (जिल्हा प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडगे)
कन्नड तालुक्यातील नागपूर हे गाव मोठ्या रहस्यमय स्फोटाने हादरले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या स्फोटाचे अद्याप कारण कळले नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून समीर शेख वय 35 असे त्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण जवळपास 80 टक्क्याहून अधिक भाजला आहे त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास समीर या पत्र्याच्या शेडमध्ये दरवाजा बंद करून काहीतरी काम करीत होता. त्यावेळेस हा प्रचंड मोठा स्फोट झाला . या स्फोटाने संपूर्ण नागापूर गाव हादरले. आवाज ऐकून शेजारचे ग्रामस्थ धावून आले. पत्राच्या शेडचा लोखंडी दरवाजा पूर्णपणे तुटल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने गंभीर जखमी समीर शेख ला बाहेर काढून खाजगी वाहनाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे उपनिरीक्षक सतीश बडे हे घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे कारण समजले नाही. दरम्यान पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले आहे. घटनास्थळी काही संशयास्पद गोष्टी आढळून आले असून एवढा मोठा स्फोट होऊनही शेजारीच असलेली गॅसची टाकी सुस्थितीत आढळून आली. तसेच तिथे कापलेले लिंबू सापडले त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरीतस्फोट नेमका कशामुळे झाला? स्फोटामुळे मोठा खड्डा कसा पडला? स्फोट होऊनही गॅसची टाकी सुरक्षित कशी राहिली? जखमी समीर शेख नेमका काय प्रयोग करत होता? येथे केवळ कापलेले लिंबू दिसून आले त्याचे कारण काय? हे सर्व प्रश्न सध्या अनुतरित असल्याने बॉम्बशोधक पथकाला पाचरण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा