डॉ.गुंटूरकर हे वैद्यकीय क्षेत्रात एकूण 33 वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पार पाडले
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
वैद्यकीय क्षेत्रात एकूण 33 वर्ष सेवा करून अनेक रुग्णांना नवे जीवदान दिलेले नायगाव ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एच. आर गुंटुरकर यांचा आज नायगाव येथे मा.आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली निरोप संभारंभ कार्यक्रम संपन्न होणार आहे.
a
डॉ.गुंटूरकर हे वैद्यकीय क्षेत्रात एकूण 33 वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पार पाडले असून नोकरीच्या सुरुवातीस बारा वर्षे नायगाव येथे कार्यरत होते, त्यानंतर नांदेड सहा वर्ष, मुखेड दोन वर्ष, नगर मधील श्रीरामपूर येथे दोन वर्ष, परत नांदेड येथे सहा वर्ष यातील सहा महिने अतिरिक्त जिल्हाशल्य चिक्सितक म्हणून पदभार सांभाळले नंतर पुन्हा नायगाव येथे पाच वर्षे अशी एकूण 33 वर्षांचा यशस्वीरित्या त्यांनी आपली डॉक्टरी पेशा सांभाळायला आहे.
त्यांच्या नियोजनाखाली नायगाव ग्रामीण रुग्णालयास 2020 ते 21 वर्षाचा व 21 ते 22 वर्षाचा असे सलग्न दोन वेळा एक एक लाख रुपये आणि सन्मान चिन्हाचा कायाकाल हा पुरस्कार त्यांनी मिळवून दिला आहे. दररोज न चुकता नोकरीवर येऊन सर्वांना शिस्तबद्ध लावणारे डॉ.एच.आर. गुंटूरकर आज शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असून या निरोप समारंभ वेळी मा.आ.वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा