maharashtra day, workers day, shivshahi news,

नांदेड माहानगर पालिका मध्ये रमाई अवास घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

प्लेनेज कन्स्ट्रंन्टस प्रा.लि या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करा - सिद्धार्थ कसबे 

Massive corruption in Ramai Awas Gharkul Yojana, Nanded Municipal Corporation, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर) 

नांदेड शहरांमध्ये गोरगरीब जनतेला माहाराष्ट्र शासनाच्या व मनपाच्या वतीने रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुल दिले जाते पण सदरील घरकुलाच्या नावाखाली प्लेनेज कन्स्ट्रंन्टस मार्फत लाभार्थ्याकडून आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय त्यांचे बिल दिले जात नाही त्याचप्रमाणे त्यांचे कोणतेही काम करण्यास नकार घंटा देत आहेत.

संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्या मनपा मधील कर्मचारी हे दाम घेतल्याशिवाय काम करत नाहीत रमाई आवास योजनेमध्ये नाव टाकल्यापासून ते पहिला टप्प्याचा लाभ मिळेपर्यंत सर्व भ्रष्टाचार चालत आहे घरकुलामध्ये बोगस नावे टाकण्यासाठी कंपनीचे लोक प्रत्येक नावासाठी पाच हजार रुपये घेतात व कामाचा वर्क ऑर्डर साठी पाच हजार त्यानंतर प्रत्येक फाईलच्या ऑनलाईन बिलासाठी प्रत्येकी चिरीमिरी देऊन कर्मचाऱ्याकडून फाईल ही शाखा अभियंताकडे जाते ते पण प्रत्येक फाईल साठी चेरीमरी घेऊन नंतर त्यांच्याकडून फाईल ही शहर अभियंता यांच्याकडे जाते ते त्या फाईलची शहानिशा न करता प्रत्येक फाईलवर कंपनीच्या लोकांकडून टक्केवारी घेऊन फाईलवर सही करतात नंतर ती फाईल संबंधित ऑडिटर कडे जाते ते प्रत्येकी फाईल साठी चिरीमिरी घेऊन नंतर फाईल लेखा विभागात जाते तेथे चेक कढण्यासाठी प्रत्येक फाईलवर चेरी मेरी घेतात हा सर्व प्रकार दलाला मार्फत मोजक्या लोकांकडून केला जातो त्याची माहिती मनपा आयुक्त यांना माहिती असून ते पण काही चौकशी करत नाहीत. 

रमाई आवास घरकुल योजनेमध्ये इस्टिमेट बनविण्याचे काम हे मे.प्लेनेज कन्ट्रक्शन प्रो.लि. यांच्या कर्मचाऱ्यांच्या असून ते बाहेर झेरॉक्स वाल्याकडून इस्टिमेट बनवून घ्या असे सांगतात त्या झेरॉक्स वर प्रत्येक घरासाठी एकच इस्टिमेट उपलब्ध आहे मग ते घर ३०० स्क्वे  फूट असो किंवा १००० स्क्वे फुट व  G +1 असं अशा सर्व प्रकारच्या घरासाठी एकच इस्टिमेट आहे त्यासाठी मनपाचे ऑडिटर कसे काय फाईलशी शहानिशा चौकशी न करता फाईल पास करत आहेत याची चौकशी करण्यात यावी हे की बी एस यु पी घरकुल योजनेमध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नावे हे चेरी मेरी घेऊन मे. प्लेनेज कन्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्या लाभार्थ्याची नावे रमाई आवास योजनेमध्ये टाकले असून त्याची आपण चौकशी करावी.

हे की रमाई आवास योजनेमध्ये प्रत्येक टप्प्याच्या बिलासाठी जीपीएस कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून त्यांची स्थळ पाहणी करणे बंधण कारक असताना मे. प्लेनेज कन्ट्रक्शन प्रा.लि. या कंपनीच्या कर्मचारी हे जीपीएस कॅमेऱ्याने फोटो न काढता बोगस फोटो काढतात व इतर घराची लोकेशन दाखवतात याची चौकशी करण्यात यावी. रमाई आवास घरकुल योजना मध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा च्या बिलासाठी लाभार्थी नसताना दलाला मार्फत फाईल दाखल करून दलाल परस्पर फाईल घेऊन जाऊन हॅन्ड टू हेन्ड सही करुण  घेत आहे.

यावर नियंत्रण कोणाचे हे नसून घरकुल योजनेमध्ये दाम करी काम असे सुरू असून यामुळे खरोखर लाभार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होत असून ते महापालिकेत बिलासाठी चकरा मारत असून त्यांचे नियमानुसार डेट वाईस काम न करता दलालाचे काम अगोदर करत असून त्यांची चौकशी करण्यात यावी व लाभार्थी आल्याशिवाय कोणत्याही दलाला मार्फत ची कामे करू नये. व हे. मे.प्लेनेज कन्स्टन्टस प्रा.लि. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तर ज्या लोकांकडे जमीन नाही अशा लोकांना दुसऱ्याची जागा दाखवून खोटे कागदपत्र तयार करून बोगस बिले काढली आहेत म्हणून त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे.

कारण यांच्यासारख्या लोकांमुळे ज्यांना घराची खरोखर आवश्यकता आहे . ते लोक घरापासून वंचित राहत आहेत व ज्यांना घरे मंजूर झाली आहेत त्यांना हे लोक पैशासाठी फाईलचे काम करीत नाहीत अशी पिळवणूक सर्वसामान्य गोरगरीब जनतेची नांदेड वाघाळा शहर महापालिकेत होत आहे. तरी आपण या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व नांदेड मनपा चा रूम नंबर १०८.१११.व २१०. व कॅन्टीन च्या बाहेरचा परिसर आणि रूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे यामध्ये संबंधित कंपनीचे लोक दलाला मार्फत लाच घेताना स्पष्ट दिसतील त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे.

तरी मा आयुक्त साहेबांना विनंती की मे.प्लेनेज कन्स्ट्रंन्टस प्रा.लि. यांना काम दिल्यापासून ते आज रोजी पर्यंत रमाई आवास योजनेमध्ये हाताळलेल्या सर्व फाईलची तात्काळ चौकशी करण्यात यावी व प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या घराची विजिट देऊन चौकशी करावे कारण यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे आपणास दिसेल व सर्व सामान्य लाभार्थ्याकडून फाईलच्या बिलासाठीची पिळवणूक होत आहे ही थांबवावी व मे.प्लेनेज कन्स्ट्रंन्टस प्रा.लि. चे कर्मचारी यांची चौकशी करून त्यांना त्वरित काढण्यात यावे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अभियंता यांची चौकशी करून त्यांना देखील निलंबित करण्यात यावे व संबंधित कंपनीचे टेंडर रद्द करून महापालिकेला काम देण्यात यावे अन्यथा लोकशाही सदस्य मार्गाने आपल्या कार्यालयासमोर दिनांक ११.०४.२०२३ रोजी पासून आमरण उपोषण करण्यात येईल याची दखल घ्यावी असेही भाजपाचे मंडळ सरचिटणीस सिद्धार्थ कसबे यांनी मा. विभागीय आयुक्त साहेब विभागीय कार्यालय संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !