पंढरीनाथ भालेराव यांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव बाजार निवडणूक 2023 या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते मा.आ. वसंतराव पाटील चव्हाण यांच्या गटाचे पंढरीनाथ भालेराव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार व अनेक मातब्बर नेत्यांनी मोठा गाजावाजा करूनही निवडणुकीला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.त्यामुळे निवडणुकीच्या आधीच वसंतराव पाटील चव्हाण गटाच्या हमाल मापारी गटाचे उमेदवार पंढरीनाथ भालेराव हे बिनविरोध निवडून आले.
त्यांचा यावेळी सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आलेल्या वेळी श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, रवींद्र पाटील चव्हाण, सुधाकर पाटील शिंदे, पांडू पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण माणिक पा चव्हाण, विठ्ठल आप्पा बेळगे, कैलास कोलमवार, श्रीकांत भालेराव.साईनाथ चन्नावार. सोमनाथ बैलके.यासह अदीजन उपस्थित होते.
बिनविरोधपणे निवडून आलेले पंढरीनाथ भालेराव हे व्यक्तिमत्व सर्वांसाठी त्यातल्या त्यात विशेषतः हमाल मापारी लोकांसोबत न्याय देण्याच्या भूमिकेने पूर्वीपासूनच एकनिष्ठ पणाने कार्यरत असल्याने यांच्या विरोधात आपला निभाव लागणार नाही म्हणून कदाचित भाजपाने उमेदवारी दाखल केली नाही अशी चर्चा मात्र होत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा