अनिकेत चव्हाण यांचा वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO)पदी निवडीबद्दल नागरी सन्मान
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
नायगाव नगरीतील भूमिपुत्र अनिकेत विनायकराव पाटील चव्हाण यांची एमपीएससी मार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नायगाव नगरीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला आहे.
नायगाव शहरातील गजानन पाटील चव्हाण यांच्या कार्यालयात दिनांक 08/एप्रिल 2023 रोजी येथील भूमिपुत्र असलेले अनिकेत विनायकराव पा. चव्हाण यांची एमपीएससी मार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) पदी निवड झाल्याबद्दल मान्यवर व नायगाव शहर वासियाच्या उपस्थित नागरिक सत्कार संन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थित शिवराज पाटील होटाळकर, देविदास पाटील बोमनाळे, माणिकराव लोहगावे, भाऊराव पाटील चव्हाण, श्रीमती पार्वतीबाई शंकरराव पाटील चव्हाण, व्यंकटराव पाटील चव्हाण, करीम भाई चाऊस, गोविंदराव पाटील मोरे, संतराम नायगावकर, भास्कर पाटील चव्हाण, सचिन पाटील बेंद्रीकर, मारुती कांबळे, बाबुराव इंगळे, व्यंकटराव लाळवंडीकर, काटेकर साहेब, प्रवीण भालेराव,
चंद्रकांत पाटील तमलुरे, राजू आप्पा बेळगे, राजू सोनकांबळे, सय्यद मुल्ला, शिवानंद पांचाळ, जुनेद पठाण, संजय गुजलवार, अशोक पा, पवार अक्षय पाटील तमलुरे, रितेश पाटील कल्याण, मिलिंद बच्छाव, शिवशंकर बच्छाव, शिवाजी पा. चव्हाण, प्रमोद शेठ बिरेवार, किरण पाटील मोरे, आधी उपस्थित होते, यावेळी गजानन शंकरराव पाटील चव्हाण व शिवसेनेचे गजानन रामराव पा.तमलुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
नायगाव विधानसभेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे अशी उपक्रम ठेवले पाहिजेत त्यांना पालकांनी सहकार्य करावे, येणाऱ्या आगामी काळात विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन भाजपा युवा नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी केले
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्यांच्या हाती त्रिलोकी झेंडा, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या या विचाराप्रमाणे नायगाव शहरातील अनिकेत चव्हाण यांनी शैक्षणिक कार्यात प्रगती करून एका चांगल्या उच्च पदावर विराजमान झाल्याने त्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिक सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा