संपूर्ण राज्यामध्ये विनायक दामोदर सावरकर या देशभक्तांच्या कार्यांचा उजाळा
जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर
विनायक सावरकरांनी देश स्वातंत्र्यासाठी त्याग केला असून त्यांचे बलिदान व देशभक्तीचे महान कार्य वाया जाऊ नये म्हणून वाई बाजार तालुका माहूर येथे गौरव यात्रेनिमित्त आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगी श्याम भारती महाराज यांनी भरगच्च कार्यक्रम घेऊन देशभक्तीचा संदेश दिलेला आहे.
सध्या संपूर्ण राज्यामध्ये विनायक दामोदर सावरकर या देशभक्तांच्या कार्यांचा उजाळा होत असून गौरव यात्रा काढण्यात आलेल्या ठिकाणी देशभक्ती तरुणांची विविध ठिकाणी व गौरव यात्रेचा सन्मान केला जात असून माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली योगी श्याम भारती महाराज यांच्या पुढाकारातून भरगच्च कार्यक्रम घेण्यात आलेला असून यात मान्यवरासह योगी श्याम भारती महाराज यांनी युवकांना विनायक सावरकर यांचे देश कार्य आपल्या मनोगततून व्यक्त करून एक देशभक्तीचा नवा संदेश दिलेला आहे.
या गौरव यात्रेमध्ये महिला पुरुष व तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर देशभक्तीचा जागर सर्वत्र उजाळून निघाला होता. ढोल ताशा व जयघोष करीत सर्वत्र परिसर दणाणून गेलेला आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा