maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडेंनी बोलवलेल्या महावितरण बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

शेतकऱ्यांच्या वीजेसंबंधी विविध प्रश्नांचा घेणार आढावा

MLA  samadhan avtaade,General distribution meeting, mangalwedha, pandharpur, shivshahi news.

शिवशाही न्यूज, मंगळवेढा (तालुका प्रतिनिधी राज सारवडे)

कोटेशन भरूनही वीज मिळत नाही जळालेली डीपी वेळेत मिळत नाही कमी दाबाने वीज पुरवठा होतो कामासाठी गेल्यानंतर अधिकारी नेट बोलत नाहीत अशा अनेक लेखी तक्रारींचा पाढा घेऊन शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांचे समोर महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रोश केला यावेळी आमदार आवताडे यांनी आठ दिवसात शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारींचे लेखी स्वरूपात उत्तर देऊन त्या तक्रारींचे निरसन करा व त्याचा अहवाल माझ्या पंढरपूर व मंगळवेढा येथील आमदार जनसंपर्क कार्यालयाकडे सादर करा अशा शब्दात महावितरण अधिकाऱ्यांना सुनावत नीट काम करा अशी अधिकाऱ्यांना तंबी दिली.

यावेळी या बैठकीला अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, महापारेषण चे कार्यकारी अभियंता शेळके, कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, उपकार्यकारी अभियंता बाळू चोरमले, प्रकाश पाटील, शाखा अभियंता यशवंत दिघे, महेश माळी, दत्तात्रय आसबे आदी अधिकारी उपस्थित होते .

अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून कामे केले आहेत किरकोळ कामासाठी पैसे मागत आहेत अशी तक्रार आल्यानंतर जे अधिकारी पैसे मागतात वेळेत कामे करत नाहीत अशा अधिकाऱ्यांच्या लेखी तक्रारी माझ्याकडे करा असे सांगत शासनाचा पगार व निधी असताना शेतकऱ्याकडून पैसे कशासाठी असा सवाल करत आमदार आवताडे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती करत महावितरण कामांसाठी कोणीही शेतकऱ्यांकडून पैसे घेत असेल तर गाठ माझ्याशी आहे असेही आ आवताडे यांनी सुनावले आहे. तसेच लेखी अर्ज मागवून घेतले आहेत ते सर्व लेखी अर्ज त्यांनी महावितरण कडे पाठवून आठ दिवसात त्या अर्जावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पंधरा दिवसानंतर पुन्हा याच शेतकऱ्यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन किती तक्रारी निकाली काढल्या याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माजी नगरसेवक कैलास कोळी, धनंजय पाटील, दादासाहेब ओमणे, सोमनाथ आवताडे, मिस्टर सरपंच विवेक खिलारे, दत्तात्रय नवत्रे, माजी सरपंच बिभीषण बेदरे, युवराज शिंदे, दिगंबर यादव, संजय बेदरे, प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे, माजी सरपंच नंदकुमार जाधव, बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, परमेश्वर येणपे, राजकुमार स्वामी, सुनिल कांबळे यांच्यासह महावितरण विभागाचे अभियंता, अधिकारी, पदाधिकारी तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !